शेड्यूल्ड कास्ट या शब्दाला योग्य शब्द वापरावा 

 शेड्यूल्ड कास्ट या शब्दाला योग्य शब्द वापरावा 

मुंबई : सरकारी व्यवहार, प्रकरणे, प्रमाणपत्रे आदींमध्ये "दलित' शब्द यापुढे वापरता येणार नाही. त्याऐवजी अनुसूचित जाती व नवबौद्ध या शब्दांचा वापर करण्यात यावा, असा शासन निर्णय आज जारी करण्यात आला. मराठीप्रमाणेच अन्य भाषांतही हा शब्द वापरण्यात बंदी करण्यात आली असून शेड्यूल्ड कास्ट या शब्दाला भाषांतरासाठी योग्य शब्द वापरावा, असेही यात म्हटले आहे. 

"दलित' शब्दप्रयोग वापरला जाऊ नये यासाठी आणि त्याला पर्यायी अनुसूचित जातीजमाती शब्द वापरला जावा, यासाठी मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. याबाबतची अजून एक याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आलेली आहे. केंद्र सरकारनेदेखील हा आदेश मान्य केला असून भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 341 नुसार निर्गमित केलेल्या राष्ट्रपतींच्या आदेशानुसार नमूद अनुसूचित जातीच्या संबोधनाकरिता सर्व व्यवहार, प्रकरणे, प्रमाणपत्र आदी कागदपत्रांमध्ये इंग्रजी भाषेत "शेड्यूल्ड कास्ट'व अन्य राष्ट्रीय भाषांमध्ये नामाभिधानाच्या योग्य अनुवादित शब्दप्रयोग करावा, अशा सूचना उच्च न्यायालयाने दिल्या आहेत. 

हवाई पाहणी करून पूरग्रस्तांच्या वेदना समजत नाही; पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला

त्याअनुषंगाने राज्य सरकारने "दलित' शब्दाऐवजी इंग्रजीत "शेड्यूल्ड कास्ट, न्यू बौद्ध' तर मराठी भाषेत "अनुसूचित जाती व नवबौद्ध' अशा संबोधनाचा वापर करावा, असे सहसचिव दिनेश डिंगळे यांनी शासनादेशाद्वारे स्पष्ट केले आहे. 


Web Title:Scheduled cast should use the correct word

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com