ऑक्सिजन एक्स्प्रेसची दुसरी खेप पश्चिम महाराष्ट्रासाठी रवाना

ऑक्सिजन एक्स्प्रेसची दुसरी खेप पश्चिम महाराष्ट्रासाठी रवाना
train

बुलढाणा : कोरोना Corona महामारीच्या पार्श्वभूमीवर देशासह राज्यात रुग्णसंख्येच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची Oxygen गरज निर्माण झाली आहे. हीच गरज ओळखून ऑक्सिजन तुटवडा दूर करण्यासाठी आंध्रप्रदेश विशाखापट्टणम पोर्ट येथील प्लॅन्टमधून ऑक्सिजन मागवण्यात आल आहेत. The Second Batch of Oxygen Express left for Maharashtra

विशाखापट्टणम पोर्ट येथून ऑक्सिजन घेऊन, ऑक्सिजनची दुसरी खेप ग्रीन कॉरिडोरच्या साहाय्याने ऑक्सिजन टँकर महाराष्ट्राकडे मार्गस्थ झाले. गुरुवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास शेगाव रेल्वे स्थानकावरून 4 टँकर पश्चिम महाराष्ट्राकडे मार्गस्थ झाले.

हे देखील पहा -

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. ऑक्सिजन अभावी अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागत आहे.

आंध्रप्रदेश विशाखापट्टणम पोर्ट येथील प्लॅन्टमधून ऑक्सिजन घेऊन ऑक्सिजन एक्सप्रेस शेगाव मार्गे पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर Kolhapur शहराकडे मार्गस्थ झाली. सुमारे 63 टन ऑक्सिजन साठा असलेले 4 टँकर रेल्वेच्या मदतीने वाहतूक करत महाराष्ट्रात आणले जात आहेत.The Second Batch of Oxygen Express left for Maharashtra

Edited By : Krushna Sathe 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com