वंचितची दुसरी यादी जाहीर

वंचितची दुसरी यादी जाहीर


पुणे : वंचित बहुजन आघाडीने आपल्या उमेदवारांची दुसरी यादी मंगळवारी जाहीर केली आहे. त्यात पुण्यातील हडपसर, वडगाव शेरी कँटोन्मेंट आणि पर्वतीमधील उमेदवारांचे नाव आहेत.

हडपसरमधून घनश्याम हाके, वडगाव शेरीमधून प्रवीण गायकवाड, पर्वतीमधून ऋषिकेश नागरे पाटील, तर कॅन्टोन्मेंटमधून लक्ष्मण आरडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

आघाडीने यापूर्वी आपल्या 22 उमेदवारांची पहिली यादी 24 सप्टेंबरला जाहीर केली आहे. विशेष म्हणजे लोकसभेचेप्रमाणे विधानसभेच्या उमेदवार यादीत देखील उमेदवारांच्या जातीचा उल्लेख करण्यात आला आहे.

22 उमेदवारांच्या यादीत पुण्यातील कसबा पेठ, कोथरूड आणि शिवाजीनगर मतदार संघातील उमेदवारांचा समावेश आहे. गेल्या अनेक वर्षांपासून वकिली करणारे दीपक शामदिरे यांना कोथरूडमधून उमेदवारी देण्यात आली आहे. तर मिलिंद काची यांना कसबा आणि अनिल कुऱ्हाडे यांना शिवाजीनगर मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

Web Title: Second list of vanchit bahujan aghadi candidates announced
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com