गॅस एजन्सीत काम करत बनवली सीड बँक
शिवशंकर चापुले

गॅस एजन्सीत काम करत बनवली सीड बँक

लातूर - संपूर्ण जगभरात 5 जून जागतिक पर्यावरण दिन World Environment Day म्हणून साजरा केला जातो. दिवसेंदिवस पर्यावरणाच्या Environment समस्यांमध्ये वाढ होत आहे. याबाबत पर्यावरण दिनीच जागरूकता व संवेदना जाग्या होतात. परंतु लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथील शिवशंकर चापुले Shivshankar Chapule या तरुणानं गॅस एजन्सीत Gas Agency  काम करत देशी वाणाची सीड बँक तयार केली आहे. आज त्याच्या जवळ 75 देशी वाणाची बियाणे Seeds उपलब्ध आहेत. त्यामुळे तो राज्यभरातील वृक्ष प्रेमीना मोफत बियाणे वाटत आहेत . 

शिवशंकर चापुले याचे शिक्षण  12 वी पर्यंत  झालेले आहे. त्याला बालपणापासून झाडांच्या निरीक्षणची आवड होती. त्यातूनच त्याला विविध झाडाच्या बिया गोळा करण्याचा छंद लागला. पर्यावरण प्रेमी शिक्षक मिलींद गिरीधारी व पोलीस अधिकारी धनंजय गुट्टे याच्या प्रोत्साहानामूळ त्याला देशी झाडाच्या बियांची बँक करण्याचे प्रोत्साहन मिळाले. यातून त्याने 75 प्रकारच्या देशी वाणाच्या बियाणांची बँक तयार केली. 

हे देखील पहा - 

शिवशंकर चापुले यांने या देशी वाणाच्या झाडाची लागवड वाढावी यासाठी फेसबुकवर माहिती पोस्ट केली आहे.  त्यावर बीज बँक तयार केली आहे. 
अनेकजण व्यक्तिगत पातळीवर व संस्थात्मक पातळीवर झाडे लावण्याचे कार्य अनेक ठिकाणी सुरू आहे. परंतु काही ठिकाणी विदेशी वाणाच्या गुलमोहर रेनट्री, काशीद अशा प्रकारची झाडे लावली जातात. यामुळे पर्यावरणाला थोडा देखील फायदा होत नाही. 

स्थानिक नागरिक देशी वाणांची झाडे लावत आहेत.  जावीत या झाडाचा फायदा जैवविविधता यासाठी व्हावा या हेतूने रेणापूर येथील निसर्ग मित्र शिवशंकरचापुले यांनी परिसरात फिरून निर्मल, पंधरा,  पांगारा, शमी मास, रोहिणी या विविध देशी झाडाच्या दुर्मिळ होत असलेले औषधी वनस्पतीच्या बिया जमा केल्या आहेत. 

त्यांनी या बिया फेसबुक ग्रुपच्या माध्यमातून मोफत वाटप केल्या आहेत. हा तरुण रेणापूर येथील गॅस एजन्सीच्या कामात रविवारी सुट्टी असते त्या दिवशी वन भ्रमंती करून बिया गोळा करत असतो अशी माहिती गॅस एजन्सी मालक बालाजी बिराजदार यांनी दिली आहे. 

Edited By - Puja Bonkile 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com