टोळक्याने केले तरुणावर कोयत्याने सपासप वार ; पुण्याच्या नऱ्हे येथील घटना 
Crime

टोळक्याने केले तरुणावर कोयत्याने सपासप वार ; पुण्याच्या नऱ्हे येथील घटना 

पुणे : नऱ्हेगावात एका अज्ञात टोळक्याने तरुणावर कोयत्याने सपासप वार केले असून यामध्ये सुमित नाना वैराट हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याला तत्काळ उपचारासाठी ससून रुग्णालयात Sasoon Hospital दाखल करण्यात आले आहे. ही घटना रविवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास झिल कॉलेज चौकात घडली. Serious Crimes Increasing in Pune 

हा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. पुण्यात Pune खुनासारखे गंभीर गुन्हे रोज घडत आहेत. त्यामुळे पुणेकर चिंतेत आहेत. नऱ्हेगावातील झील कॉलेज चौकातील रस्त्यावर सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास सात ते आठ तरुणांनी एकत्र जमून एका तरुणावर कोयत्याने सपासप वार केले.

हे देखिल पहा - 

वार झाल्यानंतर इमारतीत असणाऱ्या एका व्यक्तीने जखमी तरुणाला घरात घेऊन दरवाजा लावल्याने त्या जखमी तरुणाचा जीव वाचला असून त्याला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर आरोपी पसार झाले आहेत. दोन गटातील वादातून ही घटना घडली आहे. Serious Crimes Increasing in Pune 

आरोपींच्या शोधार्थ पथके रवाना झाली आहेत. भर चौकात ही घटना घडल्याने नागरिकांत घबराटीचे वातावरण पसरले आहे.पुण्यात गुन्हेगारी वाढत आहे. आठवड्यात दोन आठवड्यात १० खून शहरात झाले आहेत. पुणे पोलीस नेमके आहेत कुठं असा असा प्रश्न पुणेकरांना पडला आहे. 
Amit Golwalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com