इंदूरच्या प्राणी संग्रहालयात साडेसतरा वर्षाच्या वाघाचा मृत्यू

इंदूरच्या प्राणी संग्रहालयात साडेसतरा वर्षाच्या वाघाचा मृत्यू
indore zoo.jpg

इंदूर : इंदूरच्या Indore  कमला नेहरू प्राणी संग्रहालयात Kamala Nehru Zoo साडेसतरा वर्षाच्या वाघाचे Tiger शनिवारी सायंकाळी निधन झाले. नंतर प्राणिसंग्रहालयातच अंत्यसंस्कार करण्यात आले. या वाघाचे नाव बी 1 (B1)  असे होते. प्राणीसंग्रहालयाच्या अधिकाऱ्यांकडून याबाबत माहिती मिळाली आहे.  (Seventeen and a half year old tiger dies at Indore Zoo) 

प्राणिसंग्रहालय प्रभारी उत्तम यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या इंदूरच्या प्राणिसंग्रहालयात वाघ कुटुंबातील 21 सदस्य आहेत.  2013 मध्ये भोपाळमधून  बी 1 वाघासह  इतर काही वाघांना प्राणी संग्रहालयात आणण्यात आले होते.  मृत्यूवेळी बी 1 चे वय साडेसतरा वर्ष इतके होते.  खरंतर वाघाचे वय 22 ते 24 वर्षांचे असते, मात्र कधी कधी आरोग्याच्या समस्यांमुळे त्यांचा मृत्यू होऊ शकतो.  बी 1 वाघाच्या पोस्टमार्टम अहवालानुसार त्याच्या त्याचे  फुफ्फुस कमकुवत झाले  होते. तसेच त्याला हृदयविकाराचा झटकाही आला होता.  

दरम्यान, सहा दिवसांपूर्वीच भोपाळ Bhopal  येथील वनविहार नॅशनल पार्क Vanvihar National Park प्राणीसंग्रहालयात एका कमलेश नावाच्या मादी वाघिणीचा मृत्यू झाला. मृत्यूवेळी या वाघणीचे वय 13 वर्षे होते.  इंदूरच्या प्राणिसंग्रहालयातून या मादी वाघिणीला 9 मार्च 2017 रोजी वनविहार राष्ट्रीय उद्यानात आणण्यात आले होते. 

याबाबत वनविहार नॅशनल पार्कच्या संचालक अजय कुमार यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, कमलेश वाघिण 15 दिवसांपासून आजारी होती. तिच्यावर उपचारही सुरू होते. मात्र  तिची प्रकृती अधिकच खालावली गेल्याने तिचा मृत्यू झाला.  मृत्यूनंतर कमलेश वाघिणीच्या शवविच्छेदनानंतर वन विहारचे अधिकारी, डॉक्टर यांच्या उपस्थितीत पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Edited By - Anuradha Dhawade  

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com