ठाण्यात सेक्स रॅकेटचा भांडाफोड; दोन बॉलिवूड अभिनेत्री अटकेत

ठाण्यात सेक्स रॅकेटचा भांडाफोड; दोन बॉलिवूड अभिनेत्री अटकेत
sex ra

ठाण्याच्या पाचपाखाडी परिसरात घरामध्ये चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट-१ च्या पथकाने बुधवारी दुपारी छापेमारी करून पर्दाफाश केला. पोलीस पथकाला घटनास्थळी दोन अभिनेत्री, दोन महिला एजंट आणि एक पुरुष दलाल अशा पाच जणांना अटक केली आहे. लॉकडाऊनमुळे चित्रीकरण बंद असल्याने आर्थिक चणचण दूर करण्यासाठी आणि आपल्या हायफाय गरज भागविण्यासाठी  सिरीयल आणि सिनेमामध्ये अभिनेत्री म्हणून काम करणाऱ्या कलाकारांना वेश्यावृत्तीची नामुष्की पत्करावी लागल्याचे चित्र या घटनेने समोर आले आहे. (Sex racket scandal in Thane; Two Bollywood actresses arrested)

ठाणे गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने छापेमारी करून या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. मुंबईतील एका मोठ्या सेक्स रॅकेट एजंटच्या संपर्कात या दोन्ही अभिनेत्री होत्या. याच एजंटच्या माध्यमातून या दोन्ही अभिनेत्री ठाण्यात वेश्याव्यवसाय करता आल्या होत्या वेश्या व्यवसाय करता या दोन्ही अभिनेत्री लाखो रुपये घेत होत्या. दलालाच्या आणि ग्राहकाच्या माध्यमातून २ लाखाच्या मागणीवरून १ लाख ८० हजारात सौदा नक्की झाला.

हे देखील पाहा

ग्राहकाच्या वेळेनुसार दोन्ही अभिनेत्री या ठाण्याच्या पाचपाखाडी नटराज सोसायटीतील प्लॅटमध्ये आल्या. याबाबतची माहिती मिळताच गुन्हे शाखा युनिट-१ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोकणे यांनी सापाला रचून माहितीची खातरजमा करीत छापेमारी केली. घटनास्थळी एक महिला घरमालक, दोन अभिनेत्री, एक महिला एजंट आणि एक पुरुष दलाल  अशा पाचजणांना गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास गुन्हे शाखा करीत आहे.

Edited By : Pravin Dhamale

ताज्या बातम्यासाठी भेट द्या
Website - https://www.saamtv.com/
Twitter - https://twitter.com/saamTVnews
Facebook- https://www.facebook.com/SaamTV
ताज्या व्हिडिओंसाठी पहा
युट्यूब - https://www.youtube.com/channel/UC6cxTsUnfSZrj96KNHhRTHQ
टेलिग्राम - https://t.me/SaamNews

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com