म्हाडाच्या १०० घरांच्या चाव्या सुपूर्द करण्याचा शुभारंभ शरद पवारांच्या हस्ते

म्हाडाच्या १०० घरांच्या चाव्या सुपूर्द करण्याचा शुभारंभ शरद पवारांच्या हस्ते
MHADA

मुंबई : कॅन्सरग्रस्त Cancer रुग्णांच्या Patients उपचारादरम्यान नातेवाईकांना Relatives मुंबई Mumbai शहरात राहण्याची सोय व्हावी या हेतूने राज्याच्या गृहनिर्माण विभागाकडून Department of Housing 'म्हाडा’ MHADA ला १०० घरे House देण्यात आली आहेत. Sharad Pawar Inaugurated Handing Over Keys Of 100 MHADA Houses

मुंबई शहरामध्ये देशातील व राज्यातील कॅन्सरग्रस्त रुग्ण उपचारार्थ येत असतात. कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या उपचारादरम्यान मुंबई सारख्या ठिकाणी रुग्णासोबत आलेल्या नातेवाईकांची राहण्याची प्रचंड गैरसोय होत असते. 

हे देखील पहा -

मुंबईतील टाटा मेमोरियल Tata Memorial रूग्णालयामध्ये Hospital उपचारासाठी येणारया कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांना मुंबईत राहण्याची सोय आता उपलब्ध होणार आहे.  म्हाडा मार्फत १०० घरांच्या चाव्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलला सुपूर्द करण्याचा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार Sharad Pawar यांच्या हस्ते आज पार पडला.Sharad Pawar Inaugurated Handing Over Keys Of 100 MHADA Houses

महाविकास आघाडी सरकारने व राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड Jitendra Awhad यांनी हा उपक्रम हाती घेतला असून याचा शुभारंभ आज पार पडला. ३०० चौरस फुटाचे १०० फ्लॅट (घरे) यावेळी टाटा मेमोरियल हॉस्पिटलला देण्यात आले असून त्याच्या व्यवस्थापनाचे उत्तरदायित्व टाटा मेमोरियल हॉस्पिटलकडे असणार आहे. गृहनिर्माण विभाग व हॉस्पिटल प्रशासन यांमध्ये लवकरच त्या अनुषंगाने करार देखील करण्यात येणार आहे.

टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलचे हॉस्पिटलचे प्रमुख डॉ.बडवे यांच्याकडे शरद पवार यांच्या हस्ते या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या. यावेळी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, टाटा हॉस्पिटलचे डॉ. बडवे, डॉ. श्रीखंडे, गृहनिर्माणचे सचिव श्रीनिवासन, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डिगीकर आदी उपस्थित होते. Sharad Pawar Inaugurated Handing Over Keys Of 100 MHADA Houses

कॅन्सर रुग्णांच्या नातेवाईकांना मुंबईत उपचाराच्या कालावधीत राहण्याची सोय व्हावी या उद्देशाने हा उपक्रम हाती घेतला आहे असे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी सांगितले.
Edited By : Krushnarav Sathe 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com