आज कोल्हापूर दौऱ्यावर शरद पवार 

आज कोल्हापूर दौऱ्यावर शरद पवार 


पवारांच्या या दौऱ्यात जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील विजयासाठी रणनिती आखली जाईल. या दौऱ्यात ते जिल्ह्यातील दोन्ही काँग्रेसच्या नेते मंडळीसोबत चर्चा करणार आहेत. शिवाय ते प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घेणार असल्याचे वृत्त आहे. पवार हे शुक्रवारी रात्री हॉटेल पंचशील येथे मुक्कामाला आहेत. या ठिकाणी ते जिल्ह्यातील नेत्यांशी चर्चा करणार असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, पवार हे शुक्रवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास हेलिकॉप्टरने मजले येथे पोहचतील. तेथून ते के. पी. पाटील यांच्या प्रचारासाठी मुदाळकडे रवाना होतील. मुदाळ येथील परशराम बाळाजी पाटील हायस्कूलच्या मैदानावर त्यांची सभा होणार आहे. सभा आटोपून सायंकाळी पावणे सात वाजता हॉटेल पंचशील येथे दाखल होतील. शनिवारी (ता. ५) सकाळी दहा वाजता ते मजले येथून हेलिकॉप्टरने पुढील कार्यक्रमासाठी रवाना होणार आहेत.


विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे आज, शुक्रवारी कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. राधानगरी भुदरगड मतदारसंघातील पक्षाचे उमेदवार माजी आमदार के. पी. पाटील यांच्या प्रचारासाठी त्यांची मुदाळ येथे दुपारी साडेतीन वाजता प्रचार सभा होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत त्यांचा दौरा हा आघाडीसाठी महत्वाचा ठरणारा आहे.


Web Title sharad pawar on kolhapur visit today

 
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com