आज शरद पवार ईडी कार्यालयात

आज शरद पवार ईडी कार्यालयात

मुंबई: शिखर बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळाबरोबरच पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याने राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्यातच पवार यांनी स्वत:हूनच ईडीसमोर हजर होण्याचा पवित्रा घेतल्याने राष्ट्रवादी कार्यकर्तेही संघर्षाच्या पवित्र्यात आहेत. मात्र, अद्याप पवार यांना ईडीने चौकशीसाठी समन्स बजावलेले नाही. तसेच चौकशीसाठी कुणाला हजर करायचे हा तपास अधिकाऱ्याचा विशेषाधिकार असतो आणि त्यासाठी ठोस व विशिष्ट कारणे असतात, याकडे ईडी अधिकारी लक्ष वेधत आहेत. सध्या ईडी या प्रकरणी अधिक पुरावे गोळा करीत असून, जबाबही नोंदवण्यात येत आहेत. त्यामुळे जेव्हा आवश्यकता भासेल, तेव्हा पवार यांना चौकशीसाठी बोलावले जाईल, असे ईडीमधील सूत्रांचे म्हणणे आहे. दरम्यान, पवार यांना समर्थन देण्यासाठी दक्षिण मुंबईतील या कार्यालयाजवळ मोठ्या संख्येने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जमा होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज, शुक्रवारी दुपारी दोन वाजता स्वत:हून अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) मुंबईतील बॅलार्ड पियर येथील कार्यालयात हजर होणार आहेत. दरम्यान, पवार यांना ईडी कार्यालयात प्रवेश मिळण्याची शक्यता कमीच आहे.

शरद पवार यांनी गुरुवारी ट्वीट करून 'कार्यकर्ते अथवा समर्थकांनी ईडी कार्यालय परिसरात जमा होऊ नये. कार्यकर्त्यांनी पोलिस व सरकारी यंत्रणांना सहकार्य करावे,' असे आवाहन केले आहे.
 

Web Title:  Sharad Pawar today at ED office


 
No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com