VIDEO | शरद पवार-उद्धव ठाकरेंची 'फोन पे चर्चा'

VIDEO | शरद पवार-उद्धव ठाकरेंची 'फोन पे चर्चा'

मुंबई : शरद पवार यांनी राज्यपालांकडून सत्तास्थापनेसाठी राष्ट्रवादीला मिळालेल्या आमंत्रणाबाबत उद्धव यांना कल्पना दिली व राज्यात सत्तास्थापना कशी करता येईल व त्याचे स्वरूप कसे असेल, याबाबत चर्चा केली. सरकार स्थापनेसाठी शिवसेनेला साथ देण्यास राष्ट्रवादीची तयारी आहे. त्यादृष्टीने आम्ही काँग्रेसच्या आमदारांच्याही संपर्कात आहोत, असे पवार यांनी उद्धव यांना आश्वस्त केल्याचेही सांगण्यात आले.

 राज्यातील सत्तास्थापनेचा पेच अद्याप सुटलेला नाही. भाजप आणि शिवसेनेनंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तिसरा सर्वात मोठा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तास्थापनेचं आमंत्रण दिलं असून या सगळ्या घडामोडींनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी सोमवारी रात्री उशिरा फोनवरून चर्चा केली.

राज्यात सरकार स्थापन व्हावं, यासाठी पुढे काय करता येईल, यावर विचारमंथन केलं जाईल. या चर्चेनंतर शिवसेनेसोबत पुढील चर्चा होईल व अंतिम निर्णय होईल, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची फोनवर चर्चा झाल्याच्या माहितीला राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी दुजोरा दिला. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र आल्यानंतरच सरकार स्थापन करता येऊ शकतं. यासाठी निश्चितच काही वेळ लागणार आहे. आमच्या हातात २४ तास आहेत. काँग्रेसच्या नेत्यांसोबत आम्ही चर्चा करणार आहोत. काँग्रेससोबतच्या बैठकीत राज्यपालांच्या आमंत्रणावर सखोल चर्चा करण्यात येईल. 

WebTittle: Sharad Pawar-Uddhav Thackeray discusses' phone


 
No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com