खेडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी आमने-सामने; वाद गेला विकोपाला

खेडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी आमने-सामने; वाद गेला विकोपाला
sanjay raut

पुणे - खेड Khed पंचायत समिती सभापती विश्वास ठरावावरुन शिवसेना Shivsena व राष्ट्रवादी काँग्रेस NCP यांच्यातील वाद विकोपाला जात असताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत Sanjay Raut यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा कारभार योग्यरित्या सुरु असताना खेडमध्ये जे घाणेरडं राजकारण सुरु आहे त्याचा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार Ajit Pawarयांनी आमदार दिलीप मोहिते पाटील Dilip Mohite Patil यांचा बंदोबस्त करावा नाहीतर शिवसेनेकडे हा विषय सोपवावा, असा इशाराच पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. Shiv Sena and NCP clash in Khed

दिलीप मोहिते पाटील यांच्यामुळेच खेड या तालुक्यात आघाडीची बिघाडी झाली आहे. पंचायत समितीच्या जागेवरुन हे रेटून नेत आहेत, त्यांना माज आला आहे असंच म्हणावं लागेल. थोडीफार सत्ता आहे, म्हणून माज करु नका, शिवसेना नक्कीच उत्तर देईल. पंचायत समितीच्या सदस्यांना दहशतीने पळवून नेले. त्यांच्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांपर्यंत हा विषय नेला जाईल, पण हे राजकारण घाणेरडे असल्याचे स्पष्ट मत संजय राऊत यांनी  मांडले आहे.

खेड पंचायत समितीचा विषय आमच्यासाठी संपला आहे. आम्ही सुद्धा माणसं फोडू शकतो. पण नियमांनी बांधल्यामुळे आम्ही ते करणार नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमाणे आमची शरद पवार यांच्या वरही श्रद्धा आहे. आम्ही त्यांच्यापर्यंत आधी जाऊ, त्यानंतर काय करायचे हे आम्ही विचार करू. मोहिते यांची वागणूक अशीच असेल, तर पुढील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी असो की नसो, मात्र शिवसेनेचा उमेदवार असेल आणि दिलीप मोहिते यांना पाडून शिवसेनेचा आमदार निवडून येईल, असा इशाराच राऊत यांनी दिला आहे.Shiv Sena and NCP clash in Khed

दिलीप मोहिते पाटील यांनी शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य पळवून नेल्याच्या प्रकरणानंतर  राऊत यांनी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अयांना महत्वाचं आवाहन केल आहे. दिलीप मोहिते पाटील यांच्याकडे अजित पवार यांनी लक्ष द्यावं. अजित पवार यांनाशक्य नसेल तर त्यांनी हा विषय शिवसेनेकडे सोपवावा आम्ही काय ते बघून घेऊ, असंही संजय राऊत म्हणाले. Shiv Sena and NCP clash in Khed

पुढी ते म्हणाले की, शिवसेनेचे जे पंचायत समिती सदस्य गेले किंवा पळवून नेले त्यांचा बंदोबस्त आम्ही करु. दिलीप मोहिते पाटील यांचा वारु नेहमीच उधळलेला असतो. पण शिवसेनेने हातात बांगड्या भरलेल्या नाहीत. स्वाभिमानाचा मुद्दा येतो तेव्हा शिवसेना आणि शिवसैनिक सर्व बंधन झुगारुन मैदानात उतरतात. खेडमध्ये  आम्ही काय करु शकतो हे दाखवून देऊ. हा इशारा त्यांच्यासाठी, ज्यांनी शिवसेनेच्या वाघाच्या शेपटावर पाय ठेवला आहे.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com