शिवसेना-भाजप डोंबिवलीत बॅनरबाजीतून आमने-सामने 
DOMBIVALI 1

शिवसेना-भाजप डोंबिवलीत बॅनरबाजीतून आमने-सामने 

कल्याण डोंबिवलीमध्ये (Kalyan-Dombivali) शिवसेनाविरुद्ध भाजप (Shivsena-BJP) हा वाद आता शिगेला पोहोचला आहे. केडीएमसीतील कचरा संकलन करावरुन डोंबिवलीत भाजपाने बॅनर लावल्यानंतर शिवसेनेने त्याला प्रतिउत्तर देत आज डोंबिवलीत पेट्रोल दरवाढ विरोधात बॅनर लावले आहेत. गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेनेत राजकीय वाद हळूहळू वाढू लागला आहे. शहरातील नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते हे सुद्धा एकमेकांवर ताशेरे ओढताना दिसत आहेत. दुसरीकडे दोन्ही पक्षांकडून शहरभर एकमेकांनच्या विरोधात बॅनर लावले आहेत. भाजपाने कचरा संकलन कर रद्द करण्यासाठी ''विश्वस्त आहात, मालक नाहीत'' ''सेवा वाढवा कर नाही'' अशी बॅनरबाजी केली. तर आता शिवसेनेने पेट्रोल दरवाढीचा निषेध करीत डोंबिवली शहरात निषेधाचे बॅनर लावले आहेत. गेल्या सात वर्षात पेट्रोल 72 रुपयावरुन थेट 101 रुपये एवढे झाले आहे. घरगुती गॅस 410 रुपयांवरुन 809 रुपये झाले आहेत. तुम्ही विश्वस्त असून, उध्वस्त का करताय? असे प्रतिउत्तर दिले आहे.

तर दुसरीकडे शिवसेना नगरसेवक राजेश मोरे यांनी भाजपा आमदार रविंद्र चव्हाणांना पोस्टरबॉयची उपमा दिल्यानंतर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे चांगलेच भडकलेत. आणि त्यांनी शिवसेनेचे राजेश मोरे आणि राजेश कदम यांना खडे बोल सुनावित गल्लीबॉयची उपमा दिली आहे. यापूर्वीसुद्धा सेना भाजपाने एकमेकांविरोधात बॅनरबाजी आणि शेलकी टिका केली आहे. शिवसेना नगरसेवक दिपेश म्हात्रे यांनी चक्क भाजपाच्या जिल्हाध्यक्ष कांबळे यांना आमदारांचे कंपाऊंडर म्हणून टिका केली होती. त्यामुळे हा वाद आता कोठपर्यंत जातो हे पहावे लागेल.(Shiv Sena-BJP clash in Dombivali)

हे देखील पाहा

सर्वसामान्य नागरिकांचा विरोध या कराला असल्याने त्यासाठी भाजपाने हे बॅनर लावले. शिवसैनिकांनी एवढे मनाला लावून घ्यायचे नव्हते. राजेश मोरे नगरसेवक आहेत, त्यांनी महापालिकेत कधी सर्वसामान्य नागरिकांसाठी प्रश्न विचारले का? राजेश मोरे आणि राजेश कदम हे गल्लीबॉय असून त्यांना गल्लीतही कोण विचारत नाही. तीनवेळा आमदार पद भूषविणाऱ्या चव्हाणांविरोधात आजपर्यंत मोरे कधी बोलले नाही आता कोणाच्यातरी आदेशाने बोलत आहे. तसेच भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांना बोलणारे राजेश कदम कोण? शिवसेनेचे अधिकृत आहेत का ते? त्यांच्याकडे काही पद आहे का? अधिकृत व्यक्तीने बोलल्यास आम्ही समजू शकतो. २६ हजार कोटी पाटील यांनी मतदारसंघासाठी आणले, खासदार शिंदेंचे रेकॉर्ड तपासायचे का? एकदा जाऊन पाटील यांचे रेकॉर्ड चेक करा. असे शशिकांत भाजपा जिल्हाअध्यक्ष कांबळे म्हणाले.  

शशिकांत कांबळेंना गांर्भियाने घ्यायचे कारण नाही. भाजपाच्या आमदारांसह पदाधिकारी, नगरसेवकांना आता जाग आली असून बिळातून ते आता बाहेर आले आहेत. राजकारण करुन नागरिकांची दिशाभूल करण्यापेक्षा त्यांनी काम करुन दाखवावित. - दिपेश म्हात्रे, नगरसेवक शिवसेना हे दोन्ही पक्ष आता राजकारण करून टॉम अँड जेरीचा खेळ खेळणार हे मी आधीच सांगितले होते. राजकारणी टीका टिपण्णी करण्यापेक्षा दोन्ही पक्षातील पदाधिकाऱ्यांनी लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी प्रयत्न करावा. नुसती पोस्टरबाजी आणि टीका टिपण्णी करून नागरिकांची दिशाभूल करू नये असे मनसेचे प्रकाश भोईर म्हणाले आहेत.  

Edited By : Pravin Dhamale
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com