खतांची दरवाढ झाल्यामुळे केंद्र सरकारचा शिवसेनेतर्फे निषेध

खतांची दरवाढ झाल्यामुळे केंद्र सरकारचा शिवसेनेतर्फे निषेध
andolan news

धुळे - पावसाळा Rain सुरू होण्यापूर्वी आता शेतकरी Farmer शेतीच्या मशागतीमध्ये जुंपला आहे. परंतु शेतकऱ्याला शेती Farm करताना सर्वात महत्त्वाचा भाग मानला जातो ते बियाणे व खत Fertilizer या दोघांचे देखील मोठ्या प्रमाणात भाव वाढल्यामुळे शेतकऱ्यांना आता भाववाढीचा फटका चांगलाच सहन करावा लागत आहे. Shiv Sena protests against central government's hike in fertilizer prices

एकीकडे अवकाळी पाऊस व हवामान बदलाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत असून दुसरीकडे खताचे व बियाणांचे भाव वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांना आता शेती करणं खूपच अडचणीचं होऊन बसल आहे.

हे देखील पहा -

केंद्र सरकारच्या या भाववाढ विरोधामध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांतर्फे शिंदखेडा तहसील अधिकाऱ्यांना निवेदन देऊन ही दरवाढ रोखण्याबाबत निवेदन देण्यात आले आहे. तसेच तहसील कार्यालयाबाहेर शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या खतांच्या दरवाढीचा घोषणाबाजी करीत निषेध देखील केला आहे. Shiv Sena protests against central government's hike in fertilizer prices

त्याचबरोबर साक्री तालुक्यातील कृषी कन्येने व काही महिलांनी आपली शेती केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे विकायची आहे असे फलक हातात धरून धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर केंद्र सरकारच्या दरवाढीचा निषेध केला आहे. तसेच जिल्हा प्रशासनाने तीन वर्षांसाठी आमच्या जमिनी करार तत्वावर घेऊन नफ्याची शेती करून दाखवावी असा देखील उल्लेख निवेदनात करीत हे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना दिले आहे.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com