नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाबाबत भाजप आमदाराने केली 'ही' मागणी

नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाबाबत भाजप आमदाराने केली 'ही' मागणी
Ganpat Gaikwad

कल्याण : नवी मुंबई New Mumbai विमानतळाच्या Airport नामांतराचा  Renaming विषय सध्या ठाणे Thane  रायगड Raigad जिल्ह्यात चांगलाच गाजू लागला आहे.  १४ गाव सर्वपक्षीय विकास समिती, स्मार्ट भूमिपुत्र यांच्यासह आता भाजप BJP आमदार MLA गणपत गायकवाड Ganpat Gaikwad  यांनीही दि.बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी केली आहे. Shiv Sena Should Take Initiative and Name DB Patil; MLA Gaikwad

नवी मुंबई विमानतळासाठी आगरी कोळी भूमिपुत्रांच्या जागा या आरक्षित करून सरकारने त्या ताब्यात घेतला होत्या.  आता या विमानतळाचे नाव हे लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असावं अशी मागणी भूमिपुत्रांची आहे. मात्र शिवसेनेनं या भूमिपुत्रांच्या मागणीला बाजूला सारत सध्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याची तयारी केली आहे.

हे देखील पहा 

त्यामुळे आता भूमिपुत्रांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. कल्याण पूर्वेचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी सुद्धा नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव द्यावे अशी मागणी करत शिवसेना Shivsena  टिका केली आहे. आमदार गायकवाड म्हणाले की खरं तर या भागातील लोकांच्या जागा आगरी समाजाच्या होत्या आणि दि.बा. पाटील यांनी आगरी समाजाला न्याय देण्याच काम केलं आहे. त्यामुळे तिथल्या विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव दिले पाहिजे.Shiv Sena Should Take Initiative and Name DB Patil; MLA Gaikwad

आपण पाहिलं तर शिवसेना प्रत्येक काम हे घाईघाईनं करत आली आहे. मी मागेही मागणी केली होती समृद्धी महामार्ग हा दिक्षाभूमी ते चैत्यभूमी असा असल्याने या मार्गाला भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव दयावे. मात्र तेव्हाही शिवसेनेनी आठ दिवसात लगेच कॅबिनेट लावून निर्णय घेतला आणि त्याला स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिले आणि इथे देखील बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देत आहे.

आमच्या मनात सुद्धा बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आदर आहे, हिंदुत्वाची ज्योत आहे पण ज्या ज्या ठिकाणी ज्या लोकांनी चांगले काम केले आहे, त्या लोकांची सुद्धा नाव येणे गरजेचे आहे. शिवसेनेने पुढाकार घेऊन दि.बा.पाटील यांचे नाव द्यायला पाहिजे होतं पण तसे न करता जबरदस्तीने बाळासाहेब ठाकरेंचं नाव द्यायला सुरुवात केली आहे आणि ते फार चुकीचे आहे असे देखील मत आमदार गायकवाडांनी व्यक्त केले आहे. Shiv Sena Should Take Initiative and Name DB Patil; MLA Gaikwad

Edited By - Krushna Sathe 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com