आरोग्य विभागाच्या आवाहनाला शिवसेनेचा प्रतिसाद .. 

आरोग्य विभागाच्या आवाहनाला शिवसेनेचा प्रतिसाद .. 
Shiv Senas response to the call of the health department

वाशिम : राज्यात वाढत असलेल्या कोरोना Corona संसर्गामुळे वाशिम Washim जिल्ह्यात रेमडीसिव्हर Remediver, ऑक्सिजन Oxygen पाठोपाठ आता रक्ताचाही तुटवडा भासत आहे. त्यामुळे जिल्ह्यात भासत असलेल्या रक्ताचा तुटवडा बघता आरोग्य विभागाने Department of Health जिल्ह्यात रक्तदान Blood donation करण्याचं आवाहन केले होते. Shiv Senas response to the call of the health department

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण Vaccination मोहिमेचा महत्त्वपूर्ण टप्पा १ मे पासून सुरू करण्यात आला असून १८ वर्षांपुढील सर्वजण लस घेऊ शकणार आहेत. लस घेतल्यानंतर ६० दिवस रक्तदान करता येत नाही. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक लस घेण्यापूर्वी रक्तदान करावे. याला प्रतिसाद देत यवतमाळ Yavatmal- वाशिमच्या शिवसेनेच्या Shivsena खासदार भावना गवळी Bhawna Gawali यांनी रक्तदान शिबीराचं आयोजन केलं होते.

यामध्ये शिवसैनिकांना रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार सर्व कोरोनाचे नियम पाळून वाशिम मध्ये १०० जणांनी रक्तदान केलं आहे. तर जिल्ह्यातील ५ तालुक्यातील ५०० असे एकत्र मिळून ६०० बॅग रक्तदान करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. या शिबिरात खासदार भावना गवळी, शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेश मापारी Suresh Mapari सह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते. 

Edited By- Digambar jadhav

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com