नागपुरात शिवराज्याभिषेक सोहळा साजरा

नागपुरात शिवराज्याभिषेक सोहळा साजरा
nagpur

नागपूर - शिवराज्याभिषेक Shivrajyabhishek सोहळा समिती नागपूरच्या Nagpur वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक सोहळा आज नागपुरातील गांधी गेट जवळील शिवाजी महाराज चौक, महाल येथे अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. Shivrajyabhishek ceremony celebrated in Nagpur

सकाळी ७ वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज Shivaji Maharaj यांच्या पुतळ्यावर दुग्धअभिषेक करण्यात आला. त्यानंतर महाराजांना वस्त्रर्पण करून माल्यार्पण करण्यात आले. सुवासिनींच्या हाताने शिवरायांची आरती करण्यात आली आणि प्रसादाचे वितरण करण्यात आले.

हे देखील पहा -

रायगडानंतर Raigad नागपूर मध्ये मोठ्या प्रमाणात जल्लोषात शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जातो. विदर्भातील अनेक ढोलताशा पथक महाराजांना मुजरा देण्यासाठी या ठिकाणी येत असतात मात्र या वर्षी कोरोना Corona चे सावट असल्या कारणामुळे अत्यंत साध्या पद्धतीने हा सोहळा मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.

Edited By : Krushnarav Sathe 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com