शिवशाहीला आग, प्रवासी सुखरुप

शिवशाहीला आग, प्रवासी सुखरुप


पुणे-कोल्हापूर एम एच 47 E - 8031 वन ही बस सकाळी स्वारगेटहून कोल्हापूरच्या दिशेने जात होती. कात्रज घाटात एका वळणावर गाडी अचानक बंद पडली. ती सुरू करत असताना इंजिन मधून धुर आल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्याचवेळी गाडीने पेट घेतला आणि आग झपाट्याने वाढत  गेली. आग लागल्याचे लक्षात येताच तातडीने प्रवाशांना खाली उतरवण्यात आले. या बसमध्ये सुमारे 28 प्रवासी प्रवास करत होते.

शिवशाही बसच्या या देखभाल दुरुस्तीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात असल्याने या गाड्या सातत्याने दुर्घटनाग्रस्त होत आहेत. खासगी ठेकेदार आणि एस. टी. या दोघांचेही याकडे लक्ष नसल्याची तक्रार प्रवाशांनी केली आहे.

Web Title: Shivshahi Bus catches fire in katraj Ghat in Pune
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com