धक्कादायक! बीडमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची आत्महत्या.... ( पहा व्हिडिओ )

धक्कादायक! बीडमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची आत्महत्या.... ( पहा व्हिडिओ )
deep hospital

बीड  - उपचार सुरू असणाऱ्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांने Corona Positive Patient, खाजगी कोविड रुग्णालयात गळफास घेऊन आत्महत्या suicide केल्याची धक्कादायक घटना उगडकिस आली आहे. ही घटना बीड Beed शहरातील नामांकित दिप हॉस्पिटलमध्ये Deep Hospital रात्री 2 वाजता घडली आहे. रामलिंग महादेव सानप वय 35, असं ऊसतोड कामगार असणाऱ्या आत्महत्या केलेल्या मयत रुग्णाचे नाव आहे.तर हा सर्व प्रकार रुग्णालयात Hospital असणाऱ्या सीसीटीव्ही CCTV मध्ये कैद झाला आहे. Shocking Corona positive patient suicide in Beed

तर याविषयी हॉस्पिटल व्यवस्थापन बिलासंदर्भात रुग्णाला वारंवार विचारणा करत होते. त्यामुळेच माझ्या पतीने आत्महत्या केल्याचा आरोप मयताच्या पत्नीने केला आहे. तर नातेवाईकांचे सर्व आरोप हॉस्पिटल प्रशासनाने फेटाळले आहेत.

हॉस्पिटल व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणामुळे आणि बेजबाबदारपणामुळे, आमच्या रुग्णाचा जीव गेला आहे.पहाटेपासून आम्ही या ठिकाणी आलो आहोत.मात्र अद्याप पर्यंत डॉक्टरांनी साधी विचारपूस सुद्धा केली नाही.तसेच आम्ही येण्याअगोदर डॉक्टर व पोलिसांनी पंचनामा केला. पंचनामा करण्यास एवढी घाई का झाली होती ? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. Shocking Corona positive patient suicide in Beed

दरम्यान याप्रकरणी संबंधित डॉक्टर आणि रुग्णालयावर गुन्हा दाखल करावा म्हणून नातेवाईक आक्रमक झाले आहेत. नातेवाईकांनी काही वेळ रुग्णालयातचं ठिय्या दिला होता. त्यानंतर त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात धाव घेत गुन्हा दाखल करण्यात यावा. यासाठी अधीक्षक कार्यालय परिसरात, बसत एकप्रकारे ठिय्याचं दिला.

दरम्यान आत्महत्या करत असताना हॉस्पिटलमधील कर्मचारी, डॉक्टर काय करत होते ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.या घटनेनंतर खाजगी हॉस्पिटलमधील बेजबाबदारपणा समोर  आला आहे.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com