धक्कादायक ! अपहृत लेकीला शोधण्यासाठी, पोलिसांकडून 40 हजारांची मागणी 

धक्कादायक ! अपहृत लेकीला शोधण्यासाठी, पोलिसांकडून 40 हजारांची मागणी 
Beed

बीड - अपहरण Abduction झालेल्या लेकीचा Daughter शोध घेण्यासाठी, तक्रार Compaint देणाऱ्या बापाकडे Father, पोलिसांनी Police 40 हजार रुपयांची Money मागणी Demand केल्याचा धक्कादायक प्रकार, बीडच्या दिंद्रुड पोलीस ठाण्यात समोर आला आहे. Shocking Police Demand Rs Forty Thousand From Father To Search Abducted Girl

तर फिर्यादी बापाकडे पैसे मागणी करणाऱ्या कॉल रेकॉर्डिंग देखील समोर आल्या आहेत. यामुळे बीड पोलीस खात्याच्या कामावर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे. त्याचबरोबर कायद्याचे रक्षक असणाऱ्या पोलिसांकडूनचं पीडित व्यक्तींना लुटले जात असेल, तर न्याय Justice कोणाकडे मागावा ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

या प्रकरणी पीडित वडिलांनी पोलीस अधीक्षक आर.राजास्वामी यांच्याकडे तक्रार केली आहे. या तक्रारीत सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल गव्हाणकर तसेच पोलीस एजंट हनुमान अर्जुन फपाळ यांचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. Shocking Police Demand Rs Forty Thousand From Father To Search Abducted Girl

माजलगाव Majalgaon तालुक्यातील बेलूरा येथील भगवान आसाराम फपाळ यांची अल्पवयीन 17 वर्षाची मुलीचं अपहरण झालं आहे. याविषयी भगवान फफाळ यांनी 25 मे रोजी, दिंद्रुड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रार दिल्यानंतर भगवान फपाळ यांनी पोलिसांची भेट घेतली.

यावेळी पोलिसांच्या एजंट Agent असणाऱ्या मध्यस्थीने, मुलीला जर शोधायचा असेल तर साहेबांना 40 हजार रुपये द्यावे लागतील अशी मागणी केली. त्यानंतर पैसे जमवुन पंधरा हजार रुपये हनुमान नावाच्या मध्यस्थीकडे फपाळ यांनी दिले. मात्र चार-पाच दिवस उलटून गेले तरी तपासाची स्थिती शून्यावर होती.Shocking Police Demand Rs Forty Thousand From Father To Search Abducted Girl

यामुळे भगवान फपाळ यांनी पोलीस ठाण्यात चौकशी केली. परंतु पूर्ण रक्कम न दिल्याने त्यांना कोणताही प्रतिसाद दिला गेला नाही. यामुळे पोलीस एजन्ट असणाऱ्या हनुमानला विचारणा केली असता, आणखीन 25 हजार रुपये दिल्याशिवाय तपास लागू शकत नाही. असं त्याने अपहृत मुळीचुया  सांगितलं. 

यानंतर पीडित वडिलांनी पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार असून माझ्या मुलीचा तपास लावा आणि पोलीस एजंट हनुमान व अनिल गव्हाणकर यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. Shocking Police Demand Rs Forty Thousand From Father To Search Abducted Girl

या विषयी अपहरण झालेल्या मुलीची पीडित आई म्हणाली आहे, की आम्ही दिंद्रुड पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यानंतर, पोलिसांनी एजंटच्या मध्यस्थीने आम्हाला पैशाची मागणी केली. जोपर्यंत पैसे देणार नाही, तोपर्यंत तुमची मुलगी तुम्हाला वापस मिळणार नाही.

आम्ही नातेवाईकांकडून उसनवारी करून पैसे गोळा केले, आणि माझ्या सासर्‍यानी त्यांना दिले. नंतर ते चहा पाण्यासाठी दहा हजार रुपये द्या गाडी भाड्यासाठी पंधरा हजार रुपये द्या. अशी मागणी करत आहेत. आठ दिवस होऊन गेले मात्र मुलीचा शोध लागला नाही. पोलिस आमच्या कडून पैसे मागत आहेत. मात्र आम्ही गरीब आहोत, पैसे कुठून आणून द्यायचे ? असा सवाल पीडित मुलीच्या आईने उपस्थित केलाय. Shocking Police Demand Rs Forty Thousand From Father To Search Abducted Girl

तर याविषयी अपहरण झालेल्या मुलीचे आजोबा म्हणाले, की आमची मुलगी बेपत्ता झालेली आहे. तिचे काय झाले काय माहित नाही. मात्र पोलिसात तक्रार दिलीय पण दिंद्रुड पोलीस स्टेशनचे मोठे अधिकारी हे 40 हजार रुपये मागत आहेत.माझ्या मुलांनी त्यांना 15 हजार रुपये घेऊन दिले. मात्र आणखी पैसे आणून द्या अशी मागणी ते करत आहेत. मात्र अगोदर पैसे घेऊन देखील आमच्या मुलीचा शोध लागला नाही. अशी खंत मुलीचे आजोबा बाबुराव फफाळ यांनी व्यक्त केली.

याविषयी ग्रामस्थ धनंजय फफाळ म्हणाले, की घडलेला प्रकार गंभीर असून मुलीच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत  असताना पोलिसांकडून अशा पद्धतीने गरीब कुटुंबाकडे पैशाची मागणी करणे चुकीचे आहे. या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई Action केली जावी. अशी मागणी त्यांनी केलीय.

दिंद्रुड Dindrud पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक, अनिल गव्हाणकर यांच्याशी याविषयी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी व्हिडिओ प्रतिक्रिया नकार देत, या तक्रारीत काही तथ्य नाही. असं सांगत फोन ठेवला. Shocking Police Demand Rs Forty Thousand From Father To Search Abducted Girl

तर याविषयी पोलीस अधीक्षक आर.राजास्वामी म्हणाले, की संबंधित तक्रारीची चौकशी सुरू आहे. अद्याप अहवाल आला नाही. मात्र चौकशीत जे निष्पन्न होईल त्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. अशी माहिती त्यांनी दिली आहे. 

दरम्यान लेकीच्या शोध व्हावा, यासाठी मानसिक तणावात असणाऱ्या बापाकडे, पोलिसांनी पैशाची मागणी केल्याने, बीड जिल्ह्यात खळबळ उडालीय.तर या तक्रारीची योग्य चौकशी होऊन पीडित फफाळ कुटुंबाला न्याय मिळणार का ? रक्षक जर भक्षक बनत असतील तर मानवतेला काळिमा फासणारा हा दुर्दैवी प्रकार म्हणावा लागेल. 

Edited By : Krushnarav Sathe

हे देखील पहा 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com