Breaking : पुण्यात प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार

Breaking : पुण्यात प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार
crime.jpg

पुणे - पुण्यात डुक्कर खिंड भागात एका प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिकावर Builder हल्लेखोरांनी गोळीबार Shooting केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एकूण 4 राउंड फायर करण्यात आल्या आहेत. रवींद्र सखाराम तागुंडे Ravindra Tagundeअसे या प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिकाचे नाव आहे.  Shooting on famous builder in Pune

हि घटना शनिवारी सकाळी 9 वाजता चांदणी चौकात घडली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून यात 2 ते 3 गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. काही वेळापूर्वी ही घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत रवींद्र तागुंडे जखमी झालेले नाहीत. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र तागुंडे हे साडे बारा वाजण्याच्या सुमारास डुक्कर खिंड परिसरातून जात होते. यादरम्यान दोन  दुचाकीवरून आलेल्या चार हल्लेखोरांनी त्यांना अडविले. एकाने पिस्तूल रोखत त्यांच्यावर गोळीबार केला. Shooting on famous builder in Pune

हे देखील पहा -

सुदैवाने यात ते थोडक्यात बचावले आहेत. नंतर देखील आणखी पुढे जाऊन त्यांच्या दिशेने गोळी झाडली असल्याची माहिती आहे. हल्लेखोर पसार होताच त्यांनी पोलिसांना माहिती  दिली. लागलीच वरिष्ठ अधिकारी व वारजे माळवाडी पोलिसांनी धाव घेतली आहे. हल्ला कोणी आणि का केला अद्याप समजू शकलेले नाही. त्याचा तपास सुरु आहे. या घटनेने मात्र शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com