मावळमध्ये रासायनिक खतांचा तुटवडा...

मावळमध्ये रासायनिक खतांचा तुटवडा...
maval farm

मावळ : मावळ Maval तालुका हा भात पिकांनसाठी प्रसिद्ध तालुका आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाण भातशेती केली जाते. मावळामधील पवन मावळ परिसरातील शेतकऱ्यांनी Farmer मान्सून Monsoon पूर्व पावसापूर्वी पवना नदी Pawana river व बोअरवेलच्या पाण्यावर पंधरा दिवसांपूर्वीच भातपेरणी केलेल्या भातरोपांची उत्तम वाढ झाली असून, ती हिरवीगार भातरोपे वाऱ्यावर डोलत आहे. Shortage of chemical fertilizers in Maval

त्या रोपांची वाढ चांगली होण्यासाठी युरीया खत द्यायचे असते मात्र खत घेण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कृषी केंद्रावर शेतकऱ्यांनी मोठ्या गर्दी केली होती. दुकांनादारांना वेळेवर खत उपलब्ध होत नसल्याने खताचा तुटवडा भासु लागला आहे. मावळातील अनेक तरुण शेतकरी भात शेती करण्याकडे वळले आहे. मात्र राज्य सरकार अजूनही खते उपलब्ध करण्यात अपयशी ठरले आहे.

हे देखील पहा -

त्यामुळे भाताची रोपवाटिका केलेली रोपे जळून जाण्याची शक्यता मावळातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली.दरम्यान 100% पैकी 30 टक्केच खताचा पुरवठा आम्हाला केलेला आहे. 70% रासायनिक  खत आल्यानंतर आम्ही ते शेतकऱ्यांना देणार आहे. मात्र आता भात लागवडीचे दिवस आहे आणि त्यात रासायनिक खतांचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. 

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com