राज्यात कोरोना लसीची आणिबाणी: शहरांसह ग्रामीण भागात अनेक ठिकाणी लसीकरण बंद
Corona Vaccination Crowd in Mumbai

राज्यात कोरोना लसीची आणिबाणी: शहरांसह ग्रामीण भागात अनेक ठिकाणी लसीकरण बंद

मुंबई : राज्यात Maharashtra केंद्राकडून पाठविल्या जाणाऱ्या कोरोना लसींच्या डोसेसचा Corona Vaccine तुटवडा असल्याने राज्यात अनेक ठिकाणी कोरोना लसीकरण थांबवावे लागत आहे. एकीकडे राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या भयावर प्रमाणात वाढते आहे. कोरोनाचे मृत्यूही वाढत आहेत. कोरोनाच्या उपचारांमध्ये प्रभावी ठरणाऱ्या रेमडिसीवीर Remdesivir इंजेक्शनचा तुटवडाही आहे. त्यातच कोरोना लशींचाही तुडवडा निर्माण झाल्याने सगळीकडे गोंधळाची परिस्थिती आहे.  Shortage of vaccines Vaccination stopped in many places in Maharashtra

खेड तालुक्यात लसीकरण बंद..
खेड : खेड Khed तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयासह आरोग्य उपकेंद्रावर कोविड (Covid) लसीकरण लसीं अभावी लसीकरण बंद झाले आहे. तरी काही नागरिकांनी सकाळीच लसीकरण केंद्राबाहेर गर्दी केली होती. लवकरच लस उपलब्ध झाल्यावर लसीकरण सुरळीत करण्यात येणार असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे
यांनी दिली. आज अखेर 47 हजार 865 नागरीकांचे लसीकरण संपूर्ण तालुक्यात करण्यात आले आहे. तर 60 वर्षापुढील 20 हजार 322 नागरीकांनी पहिला डोस घेतला, तर 132 जणांना दुसरा डोस देण्यात आला. 45 ते 59 वयोगटातील 12 हजार 497 पहिला तर 8 नागरीकांनी दुसरा डोस देण्यात आला आहे.  

जालना जिल्ह्यात दोन दिवस पुरेल इतकाचा लसींचा साठा...
जिल्ह्यात Jalana गेल्या काही आठवड्यापासून लसीकरणाचा वेग वाढवण्यात आला आहे.आतापर्यंत जिल्ह्यात 89 हजार 791 जणांना लसीकरण करण्यात आले आहे. यात 78 हजार 284 जणांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर 11 हजार 507 जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे.सध्या जिल्ह्यात 9 हजार 600 कोविशील्डचे तर 12 हजार 500 कोव्हॅक्सिनचे डोस असा एकूण 22 हजार 100 लशींचा साठा सध्याच्या स्थितीत उपलब्ध आहे. हा लसींचा साठा फक्त दोन दिवस पुरेल इतकाच असल्याने, दोन दिवसानंतर जिल्ह्यात कोविशील्ड, कोव्हॅक्सीन लसीचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.  Shortage of vaccines Vaccination stopped in many places in Maharashtra

नवी मुंबईतील लसीकरण केंद्रावरील लस संपली..
नवी मुंबई महानगरपालिका
Mumbai Municipal Corporation आणि पनवेल महानगरपालिका Panvel Municipal Corporation क्षेत्रातील लसींचा डोस संपल्याने लसीकरण बंद करण्याची वेळ दोन्ही शहरांवर आली आहे. शहरातील 41 केंद्रावर महानगरपालिका आणि खाजगी रूग्णालयाकडून कोरोनाची लस दिली जात होती. मात्र कोरोनाचे डोस संपल्याने नवी मुंबई (Navi Mumbai) महानगरपालिकेच्या कोरोना लसीकरणाला ब्रेक लागला आहे.अनेक नागरिकांना घरी जाण्याची वेळ आली आहे. राज्यातील इतर ठिकाणांसोबतच आता मुंबईतील महत्त्वाच्या लसीकरण केंद्रावरील कोरोना लस संपलीय. अनेक लसीकरण केंद्रावर लशींचे डोस संपले आहेत. 

वर्ध्यात पहिला डोस तात्पुरता बंद...
जिल्ह्यात Wardha सध्या 81 केंद्रामधून लसीकरण प्रक्रिया सुरू आहे. त्यापैकी चार केंद्रात कोव्हॅक्सिनची लस दिली जात होती.पण, कोव्हॅक्सिनच्या लसीचा पुरवठा मर्यादीत असल्याने भविष्यात अडचण उदभू नये, याकरीता कोव्हॅक्सिनचे लसीकरण कमी करण्यात आले आहे. आता कोव्हॅक्सिनचा पहिला डोस तात्पुरता बंद करण्यात आला  असून, आता दुसरा डोस घेणाऱ्याकरीता कोव्हॅक्सिन राखीव ठेवण्यात आले आहे. लसीकरणाचा वेग वाढत असताना लसीचा पुरवठा वाढण्याचीही गरज निर्माण झाली आहे. अन्यथा लसीकरणाचा वेग मंदावण्याची शक्यता नाकारता येत नाही.   Shortage of vaccines Vaccination stopped in many places in Maharashtra

बाहेरगावावरून लस घेण्याकरिता लाभार्थी जिल्हा सामान्य रुग्णालयात आले, पण लसीचा तुटवडा असल्याने लस न घेताच आल्या पावली परत जावे लागले. त्यामुळे लाभार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे. जिल्ह्यात 1 लाख 7 हजार 77 लोकांना पहिला डोज देण्यात आला आहे. 15 हजार 234 जणांना दुसरा डोज देण्यात आला आहे.तर सध्या कोव्हॅक्सिन 3 हजार 590 उपलब्ध असून कोव्हिशिल्ड 28 हजार 400 लस उपलब्ध आहे. जिल्ह्याकरीता कोव्हॅक्सिनचा तीन हजार लसीचा साठा मंजूर झाला असल्याचे सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रभाकर नाईक यांनी सांगितले. 

Edited By- Digambar Jadhav

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com