श्रेया घोषालनं फोटो शेअर करत सांगितले बाळाचे नाव

श्रेया घोषालनं फोटो शेअर करत सांगितले बाळाचे नाव
Saam Banner Template (34).jpg

मुंबई : गायिका श्रेया घोषालने Shreya Ghoshal २२ मे ला एका गोंडस मुलाला जन्म दिला होता. गर्भवती Preganant असल्याची बातमी समजल्यानंतरचं श्रेयाच्या चाहत्यांना खूप उत्सुकता लागलेली होती. अखेर श्रेयाने आपल्याला पुत्ररत्न  झाल्याची माहिती तिने आपल्या सोशल मीडियावरून Social Media चाहत्यांना सांगितली होती. तर आता श्रेयाने आपल्या चाहत्यांसोबत फोटो पोस्ट करत आपल्या मुलाचं नाव शेअर केलं आहे. Shreya Ghoshal shared the photo and reveals her the baby name

श्रेयाने सोशल मीडियावर पती आणि मुलासोबत फोटो शेअर करत, आपल्या मुलाचं नाव देवयान ठेवल्याच सांगितले आहे. श्रेयाने या पोस्ट मध्ये लिहिलं आहे कि, ‘देवयान मुखोपाध्यायची तुम्हाला ओळख करून देत आहे. तो आमच्या आयुष्यात  22 मे ला आला. आणि आमचं संपूर्ण जगच बदलून गेल. फक्त आई वडीलचं आपल्या मुलाचा सहवास समजू शकतात. कधीही न संपणारं प्रेम या नात्यात असत. हे सर्व माझ्यासाठी एखाद्या स्वप्नासारखं आहे’. असे म्हणत श्रेयाने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

श्रेयाने गर्भवती असल्याची माहिती सोशल मीडियावरून दिल्यापासून तिच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होतं होता. या काळात श्रेया सतत चाहत्यांना अपडेट देत होती. श्रेयाचे डोहाळेजेवण खुप अनोख झालं होतं. Shreya Ghoshal shared the photo and reveals her the baby name

श्रेयाने आपला बालपणीचा मित्र शिलादित्यशी  2015 मध्ये लग्न केल होतं. सोशल वेबसाईटचा तो संस्थापक आहे. या दोघांना नवीनच पुत्ररत्न प्राप्त झाल्याने यांचे कुटुंबीय खूपच आनंदी आहेत असे श्रेयाने म्हंटले होते. यांच्या घरात देवयानच्या रुपात आनंद आला आहे.

Edited By- Sanika Gade

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com