आनंद शिंदें यांचा राजकारणात प्रवेश  

आनंद शिंदें यांचा राजकारणात प्रवेश  

 सुप्रसिध्द गायक आनंद शिंदे यांनी राजकारणात प्रवेश केला आहे. सोलापूरमध्ये त्यांनी याबाबतची घोषणा केली. 'महाराष्ट्र स्वाभिमान रिपब्लिकन पक्षाच्या' प्रदेशाध्यक्ष पदाची त्यांनी जबाबदारी स्वीकारली आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबत सांगितले. यावेळी त्यांनी 'आरपीआय नेत्यांनी कलाकारांचा फक्त वापर करून घेतल्याची टीका केली.'आनंद शिंदे यांच्या राजकीय प्रवेशामुळे ते आगामी विधानसभा निवडणूक लढवणार का? अशा चर्चा सध्या सुरु आहेत.  


आनंद शिंदे यांनी आपल्या पक्षामध्ये यावे यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी, आरपीआय आणि एमआयएम पक्षाकडून प्रयत्न सुरु होते. त्याच दरम्यान आनंद शिंदे यांनी स्वाभिमान रिपब्लिकन पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाची जबाबदारी घेतली असल्याची घोषणा केली.


Web Title:singer anand shinde enters into politics
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com