सोलापुरात 92 वर्षांच्या आजीने केली कोरोनावर मात

 सोलापुरात 92 वर्षांच्या आजीने केली कोरोनावर मात
In Solapur 92 year old grandmother defeated Corona

सोलापूर: कोरोनाची Corona दुसरी लाट Second Wave कितीही भयानक असली तर आपण त्यावर खचून न जाता यशस्वीपणे त्यावर मात करायला हवी. हे वाक्य फक्त बोलण्यापुरतेच मर्यादित राहिलेले नसून अनेक लोक या आजारावर मात देऊन घरी परतत आहेत. कोरोनाला हरवत आहेत. In Solapur 92 year old grandmother defeated Corona

असे अनेक उदाहरणे आहेत जे आपल्याला रोज ऐकायला मिळत आहेत आणि आपले मनोबल वाढवत आहेत. आपल्या जिद्दीच्या आणि जगण्याच्या जोरावर आपण कोरोना हरवू शकतो, असे आपल्यला सांगणारे एक उत्तर उदाहरण आज सोलापुरात Solapur पाहायला मिळाले आहे. 

हे देखील पहा -

सोलापूर मधील सलगर वस्ती येथे राहणाऱ्या लक्ष्मीबाई भोसले या 92 वर्षीय आज्जीने कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे. 

सलग पंधरा दिवसांपासून त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटल Civil Hospital सोलापूर येथे उपचार सुरु होते. डॉक्टरांनी केलेलं योग्य उपचार आणि आजींचा सकारात्मक प्रतिसाद यामुळे आजींनी कोरोना राक्षसाला चितपट करून विजय मिळवला आहे. आणि आपली आजी घरी आल्यानंतर त्यांच्या नातवंडांनी रोंगोळी काढुन आणि केक कापून आजीचं जंगी स्वागत देखील केलं आहे.

Edited By- Sanika Gade

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com