शिक्षकांना पुन्हा 30 दिवसांची कोरोना ड्यूटी! वेतनासाठी 'वैद्यकीय' प्रमाणपत्राचे बंधन... 

शिक्षकांना पुन्हा 30 दिवसांची कोरोना ड्यूटी! वेतनासाठी 'वैद्यकीय' प्रमाणपत्राचे बंधन... 
Solapur teachers will have to do Corona survey

सोलापूर : सोलापूर शहर-जिल्ह्यातील वाढत्या कोरोनाला(Corona) आवर घालण्याच्या हेतूने शिक्षकांना आता घरोघरी जाऊन पुन्हा सर्व्हे करावा लागणार आहे. महापालिका उपायुक्‍त जमीर लेंगरेकर (Municipal Deputy Commissioner Jamir Lengrekar) यांनी तसे आदेश काढले असून शिक्षकांना वेतनासाठी आरोग्य केंद्रावरील वैद्यकीय अधिकाऱ्याचा (Medical officers) हजेरी दाखला बंधनकारक आहे. Solapur Teachers will have to do Corona Survey Duty

दाखल्याखेरीज वेतन काढणाऱ्या मुख्याध्यापकांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा आदेशातून देण्यात आला आहे. कोरोनाची दुसरी लाट सर्वत्र सुरू झाली असून, कमी झालेला कोरोना पुन्हा जम धरू लागला आहे.रुग्णसंख्येच्या तुलनेत मृत्यूदरही वाढत असून त्यामध्ये को-मॉर्बिड (Co-morbid) रुग्णांचाच सर्वाधिक समावेश आहे. या पार्श्‍वभूमीवर शिक्षकांना आता घरोघरी जाऊन पुन्हा सर्व्हे करावा लागणार आहे.

संबंधित कुटुंबातील व्यक्‍तींची माहिती,त्यांचे तापमान, ऑक्‍सिजन लेव्हल (Oxygen level) याची नोंद करावी लागणार आहे. नागरी आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून ठराविक शिक्षकांना त्या-त्या परिसरातील कुटुंबांचा सर्व्हे करावा लागणार आहे. 

सोलापूर महापालिकेने (Solapur Municipal Corporation) पहिल्या टप्प्यात 285 शिक्षकांना कोरोना ड्यूटी दिली असून, आजपासून त्याचे काम सुरू केले जाणार आहे.
दरम्यान,कोरोना ड्यूटी(Duty) आल्यानंतरही कामावर हजर न राहणाऱ्यांचे वेतन काढल्यास संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकावर कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिकेचे उपायुक्‍त लेंगरेकर यांनी दिला आहे. Solapur Teachers will have to do Corona Survey Duty

तत्पूर्वी, ड्यूटी दिलेल्या शिक्षकांशी समन्वय साधण्यासाठी 15 शिक्षकांची नियुक्‍ती करण्यात आली असून,त्यांनी दररोजचा अहवाल सामान्य प्रशासन विभागाला द्यायचा आहे. 

Edited By -Digambar Jadhav

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com