कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी गावातील सैनिक आले धावून 

कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी गावातील सैनिक आले धावून 
soldiers

वाशीम - देशात सध्या कोरोना corona संसर्गाचा उद्रेक होत असून,रुग्णालयात बेड bed मिळणे  कठीण झाले आहे. त्यामुळं ग्रामीण भागातील कोरोना बाधितांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळं वाशिम washim जिल्ह्यातील शेलु बु येथील सीमेवर कर्तव्य बजावत असलेल्या सैनिकांनी soldier गावातील गोरगरिबांना गावात उपचार मिळावा यासाठी पुढाकार घेतला आहे. soldiers rushed to the village to treat the patient

गावासाठी काहीतरी करायचं असं या सैनिकांनी ठरविलं आणि गावात आढळलेल्या 30 रुग्णावर patients गावातच उपचार सुरू केले असून,या सर्वांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यापुढे ही गावात नेहमीसाठी उपचार सुरू ठेवणार असून, यासाठी लागणारा औषध साठा भरून ठेवला असून,आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी हे काम पाहत आहेत.

विशेष म्हणजे हे सर्व सैनिक सध्या सीमेवर आहेत. मात्र रोज गावातील परिस्थिती विचारून जेवढी आर्थिक मदत लागते ती पाठवीत आहेत. तर गावात असलेल्या प्राथमिक उपचार केंद्र आम्हाला कोविड पुरत आमच्या ताब्यात द्यावं अशी मागणी सरपंच तृष्णा गुट्टे यांनी केली आहे. एकीकडे कोरोनाने जगभरात थैमान घातले असून, ग्रामीण भागात ही मोठ्या प्रमाणात रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळं कोरोना संकट काळात आपल्या जन्मभूमीचे ऋण फेडण्याची हीच वेळ असून,आम्हाला ही संधी मिळाली याच आम्ही भाग्य समजत असल्याचं सैनिक सांगतात. soldiers rushed to the village to treat the patient

देशभरात कोरोनाने हाहाकार माजवला असून, हॉस्पिटलमध्ये hospital बेड मिळत नाहीत. त्यामुळं गावातील गोरगरिबांना गावातच मोफत उपचार मिळावा यासाठी गावात जवान सरसावले आहे. त्यामुळं या जवनाप्रमाणे प्रत्येक गावातील जबाबदार नागरिकांनी समोर येऊन,काम केल्यास कोरोनाला पळविण्यासाठी  वेळ लागणार नाही.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com