पावसाळ्यापूर्वीच्या तयारीसाठी उल्हासनगरमधील काही दुकाने उघडणार

पावसाळ्यापूर्वीच्या तयारीसाठी उल्हासनगरमधील काही दुकाने उघडणार
Some shops in Ulhasnagar will be open for Monsoon Preparations

उल्हासनगर : पावसाळ्यापूर्वी आवश्यक असलेली दुरुस्तीची कामे, घरांची झालेली पडझड अशा कामांसाठी उल्हासनगर शहरातील इलेक्ट्रॉनिक, हार्डवेअर आणि दुरुस्ती साधनांची दुकाने आज (गुरुवार)पासून खुली केली जाणार आहेत. Some Shops in Ulhasnagar will Open for Monsoon Preparations

२० ते २५ मे या काळात ही दुकाने सुरू ठेवता येणार आहेत. शनिवार आणि रविवार दोन दिवस दुकाने बंद राहतील, असे उल्हासनगर महापालिका आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांनी आदेश काढून स्पष्ट केले. नुकत्याच आलेल्या चक्रीवादळामुळे उल्हासनगर शहरात ठिकठिकाणी तात्पुरती कच्ची घरे, पत्रे यांचे नुकसान झाले आहे. 

हे देखिल पहा

तसेच पावसाळा पूर्वतयारीसाठी वेळ आणि संधी मिळावी, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून उल्हासनगर शहरातील सर्वसामान्य नागरिक आणि व्यापारी करत होते. Some Shops in Ulhasnagar will Open for Monsoon Preparations

त्यांच्या या मागणीवर सकारात्मक विचार करत डॉ. राजा दयानिधी यांनी २० मेपासून २५ मेपर्यंत शहरातील इलेक्ट्रॉनिक, हार्डवेअर आणि पावसाळा पूर्वतयारीसाठीची इतर तत्सम दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत ही दुकाने उघडी ठेवता येणार आहेत. 
Edited By - Amit Golwalkar

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com