कोयत्याने वार करत पोटच्या मुलाने केला बापाचा खून...!

कोयत्याने वार करत पोटच्या मुलाने केला बापाचा खून...!
murder in beed

बीड - दारु Liquor पिऊन आईला शिवीगाळ करणार्‍या बापाचा, कोयत्याने scythe सपासप वार करत पोटच्या मुलानेचं खून Murder केला आहे. ही खळबळजनक घटना बीड Beed तालुक्यातील पिंपळनेर Pimperner परिसरात घडली आहे. श्रीकिसन अंबादास तागड वय 60 रा.पिंपळनेर ता.बीड असे मयताचे नाव आहे. The son killed his father by attacking him with a scythe

श्रीकिसन हे दारु पिऊन सतत घरी वाद घालायचे. घरी शिवीगाळ करायचे. या रागातून मुलगा लहू श्रीकिसन तागड याने शेतात वडील एकटे असल्याचा फायदा घेत, जन्मदात्या बापावर कोयत्याने सपासप वार करत खून केला. मुलानेच बापाचा खून केल्याच्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

हे देखील पहा -

घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला असून आरोपी मुलास ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात आरोपी मुलावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. The son killed his father by attacking him with a scythe

दरम्यान याच आठवड्यात दारू पिऊन आईला त्रास देणाऱ्या बापावर आष्टी मध्ये पोटच्या मुलानेचं गोळीबार करत खून केला होता. तर आता या मुलाने कोयत्याने वार करत आपल्या  बापाचा  खून केला आहे. एका आठवड्यातील गावातील ही दुसरी घटना असल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com