खेड सभापती पोखरकरांविरोधातल्या अविश्वास ठरावाला स्थगिती

खेड सभापती पोखरकरांविरोधातल्या अविश्वास ठरावाला स्थगिती
sena

पुणे - खेड Khed पंचायत समितीचे शिवसेनेचे Shivsena सभापती भगवान पोखरकर Bhagwan Pokharkar यांच्यावरील अविश्वास ठरावाला उच्च त्यातुन स्थगिती देण्यात आली आहे. शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस NCP यांच्यातील अंतर्गत स्थानिक पातळीवर राजकीय वाद न्यायालयात पोहोचला आहे. या अविश्वास ठरावाला उच्च न्यायालयाने High Court दिलेल्या स्थगितीमुळे शिवसेनेला आधार मिळाला तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकीय खेळीवर तात्पुरती मात केली आहे. stay on No-confidence motion against Khed Speaker Pokharkar

खेड पंचायत समिती सभापती पदावरील अविश्वास ठरावावहुन स्थानिक पातळीवर सुरु झालेल्या वादात शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा सामना पहायला मिळाला या वादात दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी उडी घेतली होती.

त्यामुळे महाविकास आघाडीतील राजकीय वातावरण तापले होते. याच दरम्यान खेड पंचायत समिती सभापती भगवान पोखरकर यांच्यावर 11 विरुध्द 3 असे मतदान होऊन अविश्वास ठराव मंजुर करण्यात आला होता. या अविश्वास ठरावाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देत याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आज सुनावनी घेण्यात आली. stay on No-confidence motion against Khed Speaker Pokharkar

हे देखील पहा -

या याचिकेवर सुनावनी देत न्यायालयाने अविश्वास ठरावाला तात्पुरती स्थागिती दिली असुन पुढील सुनावनी 26 जुन ला ठेवण्यात आली आहे.  याचिकाकर्त्यांच्यावतीने ॲड. रोहन होगले यांनी याचिका दाखल केली होती त्यांनी ही माहिती दिली.

Edited By - Shivani Tichkule


 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com