बीडमध्ये महाबीजच्या सोयाबीन बियाण्यांची साठेबाजी?; शेतकरी आक्रमक 

बीडमध्ये महाबीजच्या सोयाबीन बियाण्यांची साठेबाजी?; शेतकरी आक्रमक 
beed soyabin seeds

महाबीजच्या सोयाबीन बियाणाचा कृत्रिम तुटवडा, बीड जिल्ह्यात निर्माण केला जात असल्याचा धक्कादायक आरोप, शेतकऱ्याकडून केला जात आहे. या संदर्भात कृषी दुकानदाराकडून देखील दुजोरा मिळत आहे. महाबीजच्या सोयाबीन बियाण्याची बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. त्या तुलनेत पुरवठा होत नसल्याने, दुसऱ्या कंपनीचे बियाणे खरेदी करत असताना, शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतोय. यात तब्बल 1 हजार  रुपये जास्त मोजावे लागत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. त्यात विश्वासार्हता आणि खात्री नसल्याने इतर शेतकऱ्यांचा कल दिसून येत नाही. बीडमध्ये सोयबिन बियानाचे अधिकृत 42 विक्रेते आहेत. त्यांच्याकडून वितरित न करता साठेबाजार केला जात असल्याचा किरकोळ विक्रेत्याचा आरोप आहे. या बाबतीत महाबीजच्या अधिकृत विक्रेत्यांनी आरोप फेटाळे असले तरी महाबीजच्या बियाण्याची चढ्या दराने काळ्याबाजारात विक्री केली जात असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत.(Stockpiling of Mahabeej soybean seeds in Beed)

किरकोळ विक्रेत्यांना एकही बियानाची बॅग देण्यात आलेली नाही

जिल्ह्यातील महाबीजच्या अधिकृत विक्रेत्याकडून, किरकोळ विक्रेत्यांना अद्याप पर्यंत एकही बियानाची बॅग देण्यात आलेली नाही. त्यामुळे मी दुकानदार असून मला अद्याप पर्यंत सोयाबीन मिळाली नाही.त्यामुळं मार्केटमध्ये सोयाबीन महाबीजचे बियाणे नाही. शेतकरी मागणी करत आहेत. अधिकृत विक्रेत्याकडून हे बियाणे स्टॉक करून ठेवल्याची शक्यता आहे. त्यामुळे बियाणे उपलब्ध होत नाही. असे बीड गोदावरी ऍग्रो एजन्सीचे मालक अमित मंत्री यांनी सांगितलं आहे.

सोयाबीनची लागवड क्षेत्र वाढत आहे

बीड जिल्ह्यात या वर्षी सोयाबीनची लागवड क्षेत्र वाढत असल्याचा अंदाज कृषी विभागाकडून व्यक्त केला जात आहे. खरीप हंगामातील सोयाबीन पिकाची लागवड लक्षात घेता, सर्व कंपन्यांकडून 70 हजार क्विंटल बियाणे मागवले आहे. यात महाबीजचे सोयाबीन बियाणे 11 हजार 300 क्विंटल जिल्ह्याला प्राप्त झाले आहे. मागणीपेक्षा महाबीज सोयाबीन बियाणे पुरवठा कमी असल्यामुळे, काही प्रमाणात तुटवडा भासत आहे. मात्र शेतकऱ्यांनी महाबीज सोयाबीन बियाणे, सोबत इतर बियाण्यांचा वापर करावा असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर साळवे यांनी सांगितले. तसेच चढ्या दराने कोणी खत बियाण्यांची विक्री करत असेल तर त्वरित कृषी विभागाशी संपर्क साधावा. तक्रार आल्यास कडक कारवाई केली जाईल. अकरा तालुक्याच्या ठिकाणी 11 पथक नियुक्त करण्यात आले असल्याचे देखील सांगितले. मात्र अद्याप पर्यंत एकही कारवाई करण्यात आलेली नाही. यामुळे कृषी विभागाच्या कारभारावरही संशय व्यक्त केला जात आहे.

मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी

महाबीजच्या सोयाबीन बियाणे मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी झाल्यामुळे, मार्केटमध्ये सोयाबीन उपलब्ध होत नाही. एप्रिल महिन्यापासून सोयाबीन उपलब्ध झाले होते, ती शेतकऱ्यांना दिली आहे. शेतकऱ्यांनी दुसऱ्या कंपनीचे बियाणे देखील खरेदी करावी असे आवाहन राष्ट्रीय बियाणे संघटनेचे अध्यक्ष व महाबीजचे अधिकृत विक्रेते मनमोहन कलंत्री यांनी केले आहे. 

बीड जिल्ह्यात यावर्षी महाबीज सोयाबीन बियाणे 35 हजार क्विंटल मागणी केली होती. मात्र पुरवठा अवघा 11 हजार 300 क्विंटल झाला आहे. यात पीक पाहणी प्रात्यक्षिक व वितरकाकडून 70 टक्के सोयाबीन विक्री केली गेली आहे. यामुळे मार्केटमध्ये सोयाबीनचे बियाणे शिल्लक नाही. आमच्याकडे देखील शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. मात्र पुरवठा कमी झाल्यामुळे बियाणे उपलब्ध करून देणे जिकिरीचे होत आहे. याला कृत्रीम तुटवडा म्हणता येणार नाही. मात्र नैसर्गिक आपत्तीमुळे 40 टक्के सोयाबीन खराब झाले. यामुळे तुटवडा थोडा होत आहे असे देखील महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक जगदीश गिरी यांनी सांगितले आहे. 

खाजगी कंपनीच्या बियाणांच्या दरात हजार ते बाराशे रुपयांचा फरक

दरम्यान यावर्षी बीड जिल्ह्यात सोयाबीनचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे उपलब्ध असलेले बियाणे कमी पडत आहे. यातच शासनाच्या अधिकृत महाबीज  बियाण्यामध्ये आणि खाजगी कंपनीच्या बियाणेमध्ये तब्बल हजार ते बाराशे रुपयांचा फरक पडत असल्याने, या कालावधीमध्ये शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंडाला सामोरे जावे लागत आहे. यामुळे महाबीज बियाणे पुरवठा करावेत, अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.  

Edited By : Pravin Dhamale

ताज्या बातम्यासाठी भेट द्या
Website - https://www.saamtv.com/
Twitter - https://twitter.com/saamTVnews
Facebook- https://www.facebook.com/SaamTV
ताज्या व्हिडिओंसाठी पहा
युट्यूब - https://www.youtube.com/channel/UC6cxTsUnfSZrj96KNHhRTHQ
टेलिग्राम - https://t.me/SaamNews

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com