एपीएमसी मार्केट मध्ये तुफान गर्दी; सोशल डिस्टन्सचे उडाले तीनतेरा...  

एपीएमसी मार्केट मध्ये तुफान गर्दी; सोशल डिस्टन्सचे उडाले तीनतेरा...  
A stormy crowd of people in the APMC market

सोलापूर : शहरात City मागच्या कांही दिवसांपासून कोरोना Corona बाधितांचा आकडा आटोक्यात आल्याने, लेव्हल दोन नुसार शहरातील सर्व आस्थापनांना सूट देण्यात आली आहे. मात्र, प्रशासनाने Administration दिलेल्या सुट्टीबाबत शहरातील नागरिक बेजाबदारीने वागताना पहायला मिळतं आहेत. A stormy crowd of people in the APMC market

सोलापूर एपीएमसी APMC मार्केट Market मध्ये सकाळी नागरिकांनी तुफान गर्दी केल्याचं चित्र पहायला मिळालं आहे. यातील बहुतांश नागरिकांच्या तोंडाला तर मास्क Mask देखील ही नव्हता. यामध्ये सोलापूरकरांनी सोशल डिस्टन्स Social distance चे तीनतेरा या ठिकाणी वाजवलेलं पहायला मिळाले आहे. 

हे देखील पहा 

आत्ता कुठं सोलापुरात कोरोना आटोक्यात येत असताना नागरिकांचं असे बेजबाबदार वागणं कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण देणार असल्याचे ठरणार आहे. शहरातील बाजारपेठेत पुन्हा तुफान गर्दी होत आहे. रस्त्यावर वाढणाऱ्या गर्दीमुळे पुन्हा कोरोनाचा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. 

Edited By- Digambar Jadhav


 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com