मालक बोले, तैसा रॉकी चाले! सांगलीतील गुणी रॉकीची कहाणी

मालक बोले, तैसा रॉकी चाले! सांगलीतील गुणी रॉकीची कहाणी
Saam Banner Template

सांगली: कुत्रा म्हटलं की आठवतो तो त्याचा प्रामाणिकपणा,घराची राखण करणं, मालकांशी इमान राखणं, गुरा ढोरांच्या बरोबर राहून त्यांचे रक्षण करणं.एक ना अनेक गुण असलेला हा मुका प्राणी. जॅकी श्राफ यांच्या "तेरी मेहरबानियां"या चित्रपटात आपल्याला कुत्र्याच्या सर्व गुणांची व इमानदारीची ओळख होते. सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यात हिंगणगाव बुद्रुक या गावात असाच 4 महिन्याचा एक कुत्रा आहे जो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. रॉकी असे त्या कुत्र्याचे नाव असून हा कुत्रा त्या मालकाचा शब्द खालीच पडून देत नाही. (The story of Virtue Rocky in Sangli)

हणमंत कदम हे रिटायर्ड फौजी आहेत. यांच्यासोबत हा आहे या सर्वांचा लाडका रॉकी. शेतीच्या कामात काम करुन खारीचा वाटा उचलणारा हा 'राॅकी'. घराच्या राखणीबरोबर लाॅकडाऊन काळात मुलांचा सवंगडी बनलेला आणि अवघे 4 महिने वय असलेला हा राॅकी. शेतात ठिबक अंथरण्याच काम करुन आपल्या धन्याला मदत करतोय हा रॉकी. ठिबकची पाईप तोंडात धरुन तो धावतो. त्यामुळे वेळेची बचतही होते. आणि धन्याच श्रमही वाचवतो असा हा रॉकी. मालक बस म्हणलं की तिथं रॉकी बसतो.

हे देखील पाहा

काही काम सांगा माणसं हालत नाहीत इतक्या तत्परतेने हा रॉकी कुत्रा हलून तो ते काम करतो. क्रिकेट खेळताना बॉल आणून देतो, शेतात तर 24 तास तो मालकांची पाठ सोडत नाही. शेतातील काही काम सांगितलं तर तो चुटुकसरशी करतो. आता सध्या हणमंत कदम शेतात ठिबक पाइप हाथरण्याचे काम करत आहेत. या कामात देखील रॉकी मागे नाही.

ठिबक पाइप मालकांने तोंडात देत आदेश दिला की रॉकी बरोबर एका रेषेत धावत शेवटच्या टोकापर्यंत ठिबक पाईप नेऊन सोडतो आणि पुन्हा पाईप नेण्यासाठी त्याच गतीनं रिटर्न पळत देखील येतो ,असा हा गुणी कुत्रा असून तो आमच्या कुटूंबातील सदस्य असल्याचें हे कुटुंब मानतात. जशी माणसे प्राण्याना लळा लावतात तसेच प्राणी देखील माणसाना लळा लावतात, त्यांच्या म्हणण्यानुसार देखील वागतात हेच यातून लक्षात येते.

Edited By : Pravin Dhamale

ताज्या बातम्यासाठी भेट द्या
Website - https://www.saamtv.com/
Twitter - https://twitter.com/saamTVnews
Facebook- https://www.facebook.com/SaamTV
ताज्या व्हिडिओंसाठी पहा
युट्यूब - https://www.youtube.com/channel/UC6cxTsUnfSZrj96KNHhRTHQ
टेलिग्राम - https://t.me/SaamNews

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com