विचित्र घटनेत पोकलेनचा स्फोट! हवेत उडालेले स्पेयर पार्ट लागून दोन ठार 

विचित्र घटनेत पोकलेनचा स्फोट! हवेत उडालेले स्पेयर पार्ट लागून दोन ठार 
Two Died in Poklain Blast at Latur

लातूर: लातूर Latur जिल्ह्यातील देवकरा गावाच्या शिवारात रात्री विचित्र घटना घडली आहे. या गावातील प्रभाकर मुरकुटे यांच्या शेतात विहीर खोदण्याचे काम सुरु असताना पोकलेनचा अचानक स्फोट होऊन दोन जण ठार झाले. Strange incident of Poclain machine explosion in Latur

मुरकुटे यांनी विहिर खोदण्यासाठी पोकलेन मशिन Poclain machine आणले होते.रात्री साडे आठ वाजता ठिकाणी काम सुरू करतानाच पोकलेनचा अपघात Accident झाला.

स्फोट झाल्यावर पोकलेनचे सर्व लोखंडी सामान आणि त्याचे स्पेयर पार्ट चक्क हवेत उडाले. हे उडालेले भाग बाजूलाच उभे असलेले प्रभाकर मुरकूटे आणि दहिफळे यांच्या अंगावर पडले. यात या दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. पोकलेनचा स्फोट झाल्यामुळे त्याला आग लागली होती. स्फोट  झाल्याचा मोठा आवाज ऐकून परिसरातील लोक घटनास्थळी पोहोचले. 

लोकांमार्फत घटनेची माहिती किणगाव पोलीस Police ठाण्यात देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच तात्काळ अहमदपूर Ahamadpur येथून अग्निशमन दलाच्या गाडीस Fire brigade vehicles बोलवण्यात करण्यात आले. आणि आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. पोकलेन मध्ये डिझेल असल्यामुळे आग आटोक्यात आणण्यास थोडा अवधी गेला. पोकलेन चालक गंभीर जखमी असून त्याच्यावर प्रथमोपचार केल्यानंतर त्यास अंबाजोगाई Ambajogai येथील दवाखानायत पाठविण्यात आले आहे. Strange incident of Poclain machine explosion in Latur

पोकलेनचा स्फोट विजेच्या तारेला पोकलेन स्पर्श झाल्यामुळे झाला आहे असे बोलले जात आहे.  मात्र घटना नेमकी काय आहे याची चौकशी सुरु आहे. या घटनेतील तीन व्यक्ती पैकी दोन व्यक्तींचा जागीच जीव गेला आहे.  तर एक जण गंभीर जखमी आहे. घटना कशी घडली हे स्पष्टपणे सांगण्यास पोलिसांनी नकार देत चौकशी चालू आहे असेकिणगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी शैलेश बंकवाड यांनी सांगितले.

ही घटना नेमकी कश्यामुळे घडली पोकलेन सारखे वाहनाचे पार्ट हवेत उडून कसे गेले. या बाबत सध्या अनेक तर्क लावले जात आहेत. याचे चित्र पोलीस Police तपासानंतरच स्पष्ट होईल. आवाज मोठा आल्यामुळे आजूबाजूच्या गावातील लोक मोठ्या संख्येने घटनास्थळावर आले होते. दोन्ही मृतदेह पोस्टमार्टेम साठी पाठविण्याची प्रक्रिया रात्री उशिरा पर्यंत सुरू होती. 

Edited By- Sanika Gade

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com