दबंग ३' ची  पहिल्याचं दिवशी दमदार  कमाई

दबंग ३' ची पहिल्याचं दिवशी दमदार कमाई

बॉक्स ऑफिसवर काल सलमान खानचा बहुप्रतिक्षीत 'दबंग ३' चित्रपट रिलीज झाला असून, या चित्रपटाने पहिल्याच दिवशी २४ कोटी रुपयांची घसघशीत कमाई केलीय. 

हा चित्रपट पहिल्या दिवशी २२ ते २४ कोटी रुपयांची कमाई करेल, अशी शक्यता boxofficeindia.com यांनी वर्तवली होती. एका अन्य अहवालानुसार, या चित्रपटाला १५ ते २० टक्क्यांचे देशभरात सुरू असलेल्या निदर्शनांमुळे नुकसान झाले आहे. 

तमिळ, तेलुगू आणि कन्नड भाषांतूनही 'दबंग ३' चित्रपट रिलीज करण्यात आला आहे. मात्र, यातून चित्रपटाला फारशी चांगली कमाई झालेली नाही. अन्य भाषा आणि मुख्य हिंदी भाषेतील मिळून या चित्रपटाची एकूण कमाई २५ कोटींचा आकडा पार करू शकलेली नाही.

 WebTittle :: Strong earnings on the first day of Dabangg-3

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com