परीक्षा शुल्क वाढीविरोधात विद्यापीठासमोर विद्यार्थ्यांच आंदोलन 

परीक्षा शुल्क वाढीविरोधात विद्यापीठासमोर विद्यार्थ्यांच आंदोलन 
सोलापूर आंदोलन.jpg

वृत्तसंस्था : कोरोना व्हायरसच्या  Corona Virus पार्श्वभूमीवर यंदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातर्फे Solapur University  ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहेत. मात्र,लॉकडाऊनमुळे सर्व ठप्प असल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क देणे परवडणारे नाही.  त्यामुळे यंदा विद्यापीठाने परीक्षा शुल्क माफ करावा या मागणीसाठी 'एस एफ आय' विद्यार्थी संघटनेकडून विद्यापीठाच्या गेट समोर धरणे आंदोलन करण्यात येत आहे.  (Students protest in front of the university against the increase in examination fees) 

त्याचबरोबर, जोपर्यंत विद्यापीठ प्रशासनाकडून परीक्षा शुल्क माफीचा लेखी अदेश येत नाही तोपर्यँत विद्यापीठाच्या गेट समोरून हलणार नाही असा इशारा विद्यार्थ्यांकडून देण्यात आला आहे.  यावेळी विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली, अशी माहिती विद्यार्थी प्रांतोष मजुमदार ने दिली आहे. 

Edited By- Anurdha Dhawade 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com