म्युकर मायकोसिसच्या 5 रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया

म्युकर मायकोसिसच्या 5 रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया
meucormysios

ठाणे : राज्यात कोरोनाचा Corona प्रादूर्भाव सुरू असतानाच आता  म्युकरमायक्रोसिस नावाचा बुरशीजन्य आजार आता जोर धरू लागला आहे. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील 10 डॉक्टर व मेडिकल टीमने म्युकर मायकोसिसच्या Mucor Mycosis आजारावर गेल्या सहा महिन्यापासून आतापर्यंत 5 म्युकरमायक्रोसिसच्या रुग्णांवर यशस्वी उपचार केले आहेत. त्यामुळे सर्व क्षेत्रातून त्यांचा कौतुक केले जात आहे. Successful surgery performed by 5 doctors on 5 patients with Mucor mycosis

राज्यात कोरोनाचा Corona प्रादूर्भाव सुरू असतानाच आता  म्युकरमायक्रोसिस नावाचा बुरशीजन्य आजार आता जोर धरू लागला आहे. राज्यातील विविध ठिकाणी याचे अनेक पेशंट सापडत आहेत. यावर उपाययोजना म्हणून पालक मंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांनी काही दिवसांपूर्वी कळवा Kalwa येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे म्युकर मायकोसिसच्या उपचारासाठी सुसज्य ऑपरेशन थेटर उपलब्ध करून देणार असल्याची माहिती दिली होती.

हे देखील पहा -

तसं पाहिलं तर हा बुरशीजन्य आजार कोरोनाबधित झालेल्या रुग्णांमध्ये प्रामुख्याने पाहायला मिळतो. त्यातच ज्या रुग्णांना हाय डायबिटीस, कॅन्सर सारखे सहा आजार असलेल्या रुग्णांना फक्त म्युकर मायकोसिस हा आजार होत असल्याचे समोर आले आहे. यासाठी येत्या सात ते दहा दिवसांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे सुसज्ज ऑपरेशन थेटर आणि 15 बेडचा वॉर्ड तयार होणार असल्याच शिवाजी रुग्णालयाचे डीन भीमराव जाधव यांनी सांगितले.

पालकमंत्री यांनी काही दिवसांपूर्वी म्युकर मायकोसिसवर उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे लवकरच सूसज्य व्यवस्था उपपब्ध होईल असे सांगितले होते. परंतु त्या आधी पासूनच रुग्णालयात पाच स्पेशालिस्ट डॉक्टरांची टीम आणि पाच मेडिकल टीम काम करत आहे.

यामध्ये कोरोनाचा पहिल्या लाटेतील 2 तर दुसऱ्याला 3 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आला आहे. प्रामुख्याने पाहिलं हा आजार आहे. हा आजार सायनस म्हणजे नाकाद्वारे तसेच डोळे द्वारे मेंदू पर्यंत पोचतो. त्यामुळे त्यांच्यावर वेळीच उपचार घेतला नाही तर अंधत्व देखील येऊ शकतो किंवा डोळे काढण्याची सुद्धा वेळ येऊ शकते असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. 

Edited By- Sanika Gade

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com