सोशल मीडियाचा असाही उपयोग!; फेसबुकवरून विकलं 2 टन अंजीर 

सोशल मीडियाचा असाही उपयोग!; फेसबुकवरून विकलं 2 टन अंजीर 
Saam Banner Template

बारामतीतील शेतकरी प्रताप घोरपडे यांनी 1 एकर अंजीराची लागवड केली. पीक जोमात आलं आणि लॉकडाऊन पडलं. त्यामुळे मार्केट व्यवस्था ठप्प झाली. व्यापाऱ्यांनी देखील पड्या भावाने मागितली म्हणून त्यांनी अंजीराची बारामतीत होम डिलिव्हरी द्यायचं ठरवलं त्यातून घोरपडेना प्रतिकिलो 100 रुपये इतका दर मिळतोय. आतापर्यंत 2 टन अंजीर त्यांनी विकल आहे. घोरपडेनी अंजीराची लागवड केली. त्यांनतर पीक जोमात आलं,  परंतु लॉकडाऊन पडल्यामुळे त्यांना अंजीर विकत येईना. मग त्यांनी नामी शक्कल लढवली.  

गेल्या 2 महिन्यापासून सोशल मीडियाचा योग्य वापर करून घोरपडे आपल्या अंजीराची विक्री करत आहे. ते देखील बारामतीमध्ये. व्यापाऱ्यांनी अंजीर कमी भावात मागितले परंतु, त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून होम डिलिव्हरी केली.(Such use of social media 2 tons of figs sold on Facebook)

हे देखील पाहा

दररोज घोरपडे बारामतीत साधारणपणे 30 किलो मालाची होम डिलिव्हरी करतात. गेल्या 2 महिन्यापासून ते होम डिलिव्हरी बारामतीतील लोकांना देत आहेत. आतापर्यंत 2 टन अंजीराची विक्री केली आहे.  अजून त्यांना 1 टनाचे उत्पन्न अपेक्षीत आहे.

अंजीर चवीला गोड असल्याकारणाने ग्राहक ही वारंवार अंजीराची ऑर्डर करीत आहेत. शिवाय उत्तम प्रतीची अंजीर त्यांना घरपोच मिळत असल्याने घोरपडेंचे ग्राहक देखील समाधानी आहेत. व्यापाऱ्यांनी कमी भावात अंजीर मागितली परंतु, घोरपडेंनी व्यापाऱ्यांना कमी भावात न देता आपली मार्केट व्यवस्था उभी केलीये. याचा आदर्श इतर शेतकऱ्यांनी घ्यावा ही अपेक्षा. 

Edited By : Pravin Dhamale

ताज्या बातम्यासाठी भेट द्या
Website - https://www.saamtv.com/
Twitter - https://twitter.com/saamTVnews
Facebook- https://www.facebook.com/SaamTV
ताज्या व्हिडिओंसाठी पहा
युट्यूब - https://www.youtube.com/channel/UC6cxTsUnfSZrj96KNHhRTHQ
टेलिग्राम - https://t.me/SaamNews

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com