बीड जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.गित्ते यांची तडकाफडकी बदली

बीड जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.गित्ते यांची तडकाफडकी बदली
beed

बीड - बीड जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सूर्यकांत गित्ते यांच्या विषयी, एक ना अनेक तक्रारी आल्याने त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आलीय. तर त्यांच्या जागी डॉ. सुरेश साबळे यांची जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून नियुक्ती करण्यात आलीय.  Sudden replacement of Beed District Surgeon Dr Gitte

कोरोनाच्या काळात बीड Beed जिल्हा District रुग्णालयाची Hospital अत्यंत दयनीय अवस्था झाल्याबाबत, त्याचबरोबर रेमडिसीवर Remdesivir इंजेक्शन बाबत देखील त्यांच्याविषयी तक्रारी होत्या. याशिवाय कोरोना मृत्यू दर देखील रोखण्यामध्ये रुग्णालय प्रशासनाला अपयश आले होते.

यामुळे केवळ तीन ते चार महिन्यातच पूर्वीचे जिल्हा शल्यचिकित्सक Surgeon डॉ. सूर्यकांत गीते यांच्याकडून बीड जिल्हा शल्यचिकित्सक पदाचा पदभार काढून घेत डॉ.गीते यांना केज तालुक्यातील लोखंडी सावरगाव येथील शासकीय रुग्णालयाचा पदभार देण्यात आला आहे. 

तर डॉ.सुरेश साबळे यांनी पदभार स्वीकारताचं, त्यांच्या कॅबिनमध्ये स्वागतासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली झाली होती. यामुळं कोरोनाच्या संसर्गाला निमंत्रण मिळालंय. दरम्यान डॉ.सुरेश साबळे हे माजलगाव येथे वैद्यकीय अधिकारी पदावर कार्यरत होते.

हे देखील पहा -

त्या ठिकाणी त्यांच्याविषयी देखील अनेक तक्रारी आलेल्या आहेत. कामाविषयी ज्यांनी तक्रारी केल्या, त्या आमदार प्रकाश सोळुंके यांनीच, त्यांना जिल्हा शल्य चिकित्सक हे पद मिळावं म्हणून प्रयत्न केले आहेत. आणि विरोधीपक्षनेते असतांना मंत्री धनंजय मुंडे Dhananjay Munde यांनी याच डॉ.साबळेंवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली होती.

आता त्याचं धनंजय मुंडेंच्या पालकमंत्री असणाऱ्या बीड जिल्ह्याच्या प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक पदाची धुरा डॉ.साबळेंना दिलीय. यामुळं आगीतून काढलं अन फुफट्यात टाकलं. अशीच चर्चा जिल्हाभर सुरू आहे.

Edited By : Krushnarav Sathe 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com