आंबोली घाटात तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न

आंबोली घाटात तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न
Saam Banner Template

आंबोली: आज दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास आंबोली बसस्थानकावरून एका युवतीने संजय पाटील नामक रिक्षाचालकाची रिक्षा सावंत वाडीला जायचे आहे असे सांगून भाड्याने घेतली व ती सावंतवाडीच्या दिशेने रवाना झाली. दरम्याने घाटात तिने दरड पडलेल्या ठिकाणी रिक्षा थांबवली व घाटातील नजारा बघावा म्हणून ती घाटातील संरक्षक कठड्यावर चढली हे बघताच रिक्षाचालकाने तिला खाली उतरण्याची विनंती केली. परंतु तितक्यात तिने चप्पल व ओढणी संरक्षक कठड्यावर तीच ठेवून खाली उडी मारणे ती जवळपास दोनशे फूट खाली कोसळली हे बघून घाबरलेल्या स्थितीत रिक्षा चालवत आंबोली पोलिस स्थानकावर आले व त्यांनी घडलेली घटना आंबोली पोलिसांना सांगितले. (Suicide attempt of a young woman in Amboli Ghat)

त्यानंतर आंबोली पोलिस स्थानक प्रमुख बाबु तेली दत्तात्रय देसाई व आंबोली मधील रेस्क्यू टीम चे कार्यकर्ते आपत्कालीन व्यवस्थापन कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले व त्यांच्या अथक प्रयत्नानंतर तिला प्रतिकूल परिस्थितीत पाऊस वादळ वारा धोके असतानाही जिवंत व सुखरूप बाहेर काढणे तात्काळ तिला 108 रुग्णवाहिकामधून आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये नेण्यात आले.

हे देखील पाहा

यावेळी तिचा पायाला व कमरेला दुखापत झाल्याचे समजले पोलिसांनी अधिक चौकशी केली असता तिचे नाव कमल रामनाथ ईदे राहणार शिरोडा वय वर्षे 24 असल्याचे समजले.  अशाप्रकारे आत्महत्येचा प्रयत्न का केला असावा याबाबत मात्र माहिती मिळू शकली नाही.  पोलीस अधिक उपचारानंतर तिची माहिती गोळा करून आत्महत्या करण्याची कारणे काय आहेत याबाबत तपास करणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक सावंतवाडी सचिन हुंदळेकर पोलीस उपनिरीक्षक तोसिफ्र सय्यद पोलीस पोलीस उपनिरीक्षक आनंद यशवंते आधी उपस्थित होते.

तर आपत्कालीन बचाव समिती तर्फे ही कामगिरी विशाल बांदेकर अजित नार्वेकर उत्तम नार्वेकर संतोष पालेकर राकेश अमृतकर  अमरेश गावडे दीपक मिस्त्री हेमंत नार्वेकर मायकल डिसोजा यांनी पार पाडली.

Edited By : Pravin Dhamale

ताज्या बातम्यासाठी भेट द्या
Website - https://www.saamtv.com/
Twitter - https://twitter.com/saamTVnews
Facebook- https://www.facebook.com/SaamTV
ताज्या व्हिडिओंसाठी पहा
युट्यूब - https://www.youtube.com/channel/UC6cxTsUnfSZrj96KNHhRTHQ
टेलिग्राम - https://t.me/SaamNews

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com