पोलिसांनी समन्स बजावल्यानंतर सुनिल पाल चौकशीला हजर

पोलिसांनी समन्स बजावल्यानंतर सुनिल पाल चौकशीला हजर
sunil pal

मुंबई - कोरोना Corona  काळात रुग्णांची दिवस-रात्र सेवा करणार्‍या डॉक्टरांची Doctor बदनामी केल्याप्रकरणी कॉमेडियन सुनील पाल Sunil Pal विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनीpolice समन्स बजावल्यानंतर सुनील पाल चौकशीला हजर राहिला. Sunil Pal appeared in police station
 
कोरोना काळात रुग्णांची दिवस-रात्र सेवा करणार्‍या डॉक्टरांची बदनामी करणारे व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी कॉमेडियन सुनिल पाल याच्याविरुद्ध अंधेरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. 

हे देखील पहा -

अभिनेता सुनिल पाल यांनी डॉक्टरांविषयी एक व्हिडीओ व्हायरल केला आहे, त्यात डॉक्टरांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य तसेच टिका करण्यात आली होती.एका चॅनेल्सशी संवाद साधताना त्यांनी एका व्हिडीओमध्ये डॉक्टर शैतानाच्या वेशा फिरत आहेत, कोरोनाच्या नावाने डॉक्टरांकडून गरिबांना घाबरविले जात आहे. 

हॉस्पिटलमध्ये बेड, औषध, प्लाझमा नाही असे सांगून त्यांचे मानसिक शोषण केले जात आहे. गरीब रुग्णांचा सायंकाळपर्यंत मृत्यू होईल याची पुरेपुरे काळजी घेतली जात आहे असे वक्तव्य व्हिडिओत केले होते.

या प्रकरणी एका डाँक्टरांच्या संघटनेकडून दाखल केलेल्या अर्जानुसार अंधेरी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपासाला सुरूवात केली होती. त्यानंतर आता या प्रकरणात पोलिसांनी  समन्स बजावल्यानंतर सुनील पाल चौकशीला हजर राहिला.  

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com