सुप्रीम कोर्टाने परमबीर सिंग यांची याचिका फेटाळली

सुप्रीम कोर्टाने परमबीर सिंग यांची याचिका फेटाळली
param

मुंबई - माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग Parambir Singh यांनी त्यांच्या विरोधात असलेल्या सर्व आरोपांची चौकशी महाराष्ट्र Maharashtra बाहेरील स्वतंत्र तपास यंत्रणेकडून केली जावी, अशी मागणी करणारी एक याचिका सर्वोच्च न्यायालयात Supreme Court दाखल केली होती. मात्र या याचिकेवर सुनवाई करण्यास कोर्टाने नकार दिला आहे. सध्या सिंग यांच्या विरोधातील आरोपांची चौकशी महाराष्ट्र पोलिस Maharashtra Police यांच्याकडून केली जात आहे. पण तसे न करता या सर्व प्रकरणांची चौकशी राज्याबाहेरील स्वतंत्र तपास यंत्रणेकडे द्या, अशी मागणी सिंग यांच्या कडून करण्यात आली होती. The Supreme Court rejected Parambir Singhs plea

सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती हेमंत गुप्ता आणि न्यायमूर्ती वी.राम सुब्रमण्यम यांच्यासमोर सिंग  यांच्या याचिकेवर सुनावणी पर पडली. सुप्रीम कोर्टने आता याचिकाकर्त्यांना मुंबई हायकोर्टाकडे जाण्याचा सल्ला दिला आहे. वरिष्ठ वकील महेश जेठमलानी यांनी परमबीर सिंह यांच्यावतीने युक्तिवाद केला आहे. कोर्टाने सुनावणी करताना या प्रकरणी भाष्य केले आहे.

हे देखील पहा -

"परमबीर सिंग, तुमची मागणी खूपच आश्चर्यकारक आहे. तुम्ही इतकी वर्षे पोलिस दलात कार्यरत आहात. आता तुम्हाला राज्याबाहेर तुमची चौकशी हवी आहे असे म्हणता येणार नाही. तुम्ही महाराष्ट्र केडरचा भाग आहात, आपल्याच राज्याच्या कारभारावर विश्वास ठेवा.   जे लोक इतके वर्षे तिथेच काम करत होती त्यांनी त्या गोष्टी विरोधात मत व्यक्त करणे  पटत नाही. ज्यांची स्वत:ची घरे काचेची असतात, ते दुसऱ्यांच्या घरावर दगडं मारत नाहीत"असे सुप्रीम कोर्ट म्हणाले आहे.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com