पोलीस कस्टडीत चोरीच्या आरोपीचा संशयास्पद मृत्यू....

पोलीस कस्टडीत चोरीच्या आरोपीचा संशयास्पद मृत्यू....
Saam Banner Template

गोंदिया - जिल्हयातील मालमत्ता, चोरी Chori घरफोडी करणारे गुन्हेगार theft  यांचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी Police  20 मे रोजी आमगावच्या जिल्हा परिषद शाळेतुन दोन वेळा चोरी करणाऱ्या चार आरोपींना Suspect पकडले होते. Suspected death of accused in theft in police custody 

त्यापैकी मुख्य आरोपी राजकुमार अभयकुमार वय 30 राहणार कुंभारटोली याचा २१ मे च्या रात्री आमगाव पोलिस कस्टडीतच Suspect मृत्यू  Death झाला आहे. या प्रकरणात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून कुटूंबियानी पोलिसावर हत्येचा Murder आरोप केला आहे. आमगाव पोलिस स्टेशन परीसरात पोलीसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला असून शेकडो नागरीकांनी पोलीस स्टेशनला घेरले आहे. तणावाची परीस्थिती पाहता जिल्हा पोलीस अधीक्षक पानसरे हे घटनास्थळी दाखल झाले आहेत.

हे देखील पहा -

स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी राजकुमार अभय कुमार 30 वय, सुरेश धनराज राऊत 31 वय, राजकुमार गोपीचंद मरकाम 22 वय व एक अल्पवयीन बालक अशा चौघांना अटक केली होती. एक विधी संघर्ष बालक असल्यामुळे त्याला सोडून तिघांना पोलीस कस्टडीत ठेवण्यात आले होते. पोलीस कस्टडीतच राजकुमार अभयकुमार याचा मृत्यू झाला आहे. Suspected death of accused in theft in police custody 

राजकुमारचा मृत्यू नेमका कशामुळे झाला ही बाब स्पष्ट होऊ शकली नाही. असे असले तरी त्याला खूप घाम आला होता त्यामुळे हृदयविकाराच्या झटक्यामुळेच त्याचा मृत्यू झाल्याचा संशय ठाणेदार चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com