थ्रिलर आणि सस्पेन्सने भरलेला तापसी पन्नूने शेयर केला हसीन दिलरुबाचा ट्रेलर 

थ्रिलर आणि सस्पेन्सने भरलेला तापसी पन्नूने शेयर केला हसीन दिलरुबाचा ट्रेलर 
taapasee pannu.jpg

बॉलीवूड अभिनेत्री तापसी पन्नू Taapsee Pannu, अभिनेता विक्रांत मस्से Vikrant Massey अभिनीत थ्रिलर आणि सस्पेन्स 'हसीन दिलरुबा' Haseen Dillruba चित्रपटाचा  ट्रेलर नुकताच रिलीज झाला. या ट्रेलरला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली आहे. येत्या 2 जुलै रोजी हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. आता तापसीनेही या चित्रपटाचा  ट्रेलर आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेयर केला आहे. विनिल मॅथ्यू दिग्दर्शित या चित्रपटात विक्रांत मस्से आणि हर्षवर्धन राणे यांच्याही मुख्य भूमिका आहेत. (Taapsee Pannu shared the trailer of Haseen Dilruba) 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Taapsee Pannu (@taapsee)

चित्रपटाच्या ट्रेलरनुसार तापसीने (राणी) या चित्रपटात एका विवाहित महिलेची भूमिका साकारली आहे.  मात्र एका अपघातात  तिचा पती विक्रांत मस्सेचा ( रीषू)  मृत्यू होतो. रीषूला राणीचे दुसऱ्या मुलाशी (हर्षवर्धन राणे) विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय येतो. यादरम्यान एका स्फोटात रीषूचा मृत्यू होतो.  याच संशयावरून सीआयडी स्टार आदित्य श्रीवास्तव यांच्या नेतृत्वात  पोलिस या स्फोटासाठी राणीवर संशय घेतात आणि तिची चौकशी सुरू करतात.  राणीनेच हा स्फोट घडवून आणल्याची खात्री पोलिसांना आहे तर आता राणीला आपण निर्दोष असल्याचे सिद्ध करायचे आहे. त्यामुळे आता पोलिसांचा संशय खरा ठरतो की राणी स्वतःला निर्दोष सिद्ध करते, ही पाहण्यासाठी तुम्हाला हा चित्रपटच पाहावा लागेल. 

हसीन दिलरुबा चित्रपट  सस्पेन्स आणि थ्रिलरने परिपूर्ण आहे. त्यातील संवादही जबरदस्त लिहिलेले आहेत. तापसी, हर्षवर्धन आणि विक्रांतच्या प्रेमाच्या वेगवेगळ्या छटा दाखवण्यात आल्या असून यात तुम्हाला प्रेमाचा त्रिकोण म्हणजेच लव्ह ट्रांयगल पाहायला मिळणार आहे. हसीन दिलरुबाबद्दल बोलायचे झाल्यास विनिल मॅथ्यू दिग्दर्शित  हा चित्रपट आनंद एल रॉय यांच्या यलो पेज या  बॅनरखाली तयार करण्यात आला आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख सप्टेंबर 2020 मध्ये निश्चित करण्यात आली होती. आता 2 जुलै रोजी हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com