टार्झन स्टार जो लारा यांचा विमान अपघातात मृत्यू

टार्झन स्टार जो लारा यांचा विमान अपघातात मृत्यू
Tarzan star Joe Lara

टार्झन स्टार जो लाराने Tarzan star Joe Lara 1988 मध्ये  ‘टार्झन इन मॅनहॅटन’ Tarzan in Manhattan' या चित्रपटात 'टार्झन' Tarzan ची मुख्य भूमिका निभावली होती. या चित्रपटानंतर टार्झनने "टार्झन: द इपिक अॅडव्हेंचर" Tarzan: The Epic Adventure या टिव्ही मालिकेत TV series काम केले. या मालिकेतील अभिनयामुळे त्याला प्रसिद्धी मिळाली. जो लारा यांच्यासोबत सात जणांच विमान अपघातात मृत्यू झाला. (Tarzan star Joe Lara dies in plane crash)

हे विमान नॅशविले शहाराजवळील तलावामध्ये कोसळले. या विमान प्रवासात जो लारा यांची पत्नी देखिल होती. गेल्या शनिवारी फ्लॉरिडाच्या टेमिनी विमानतळावरून 11 वाजता विमानाने उड्डाण भरले होते. उड्डाणच्या काही क्षणातच विमानाचा हा भीषण अपघात झाला. 

हे देखिल पहा -

जो लारा यांनी ग्वेन शॅम्बलिनशी 2018 मध्ये लग्न केले होते.  नॅशविले जवळील पर्सी  प्रिस्ट तलावात शोधकार्य आणि बचावकार्य सुरू आहे, असे रदरफोर्ड काउंटीच्या अग्निसुरक्षा कॅप्टन जॉन इंगळे यांनी निवेदनात माहिती दिली आहे. ब्रॅंडन हॅना, ग्वेन एस. लारा, विल्यम जे. लारा, डेव्हिड एल. मार्टिन, जेनिफर जे. मार्टिन, जेसिका वॉल्टर्स आणि जोनाथन वॉल्टर्स हे ब्रॅन्टवुड टेनेसी या शहरातील रहिवाशी आहे. त्यांच्या परिवारशी संपर्क साधल्यास त्यांची नावे जाहीर करण्यात आली आहे. लारा जो केवळ 58 वर्षाचे होते . तसेच त्यांची दोन लग्न झालेले होते.  


फेडरल एव्हिएशन अ‍ॅडमिनिस्ट्रेशनने दिलेल्या माहितीनुसार , शनिवारी फ्लॉरिडाच्या टेमिनी विमानतळावरून रात्री 11 वाजता उड्डाण केले होते. 'सेस्ना सी 501' हे विमान पर्सी प्रिस्ट तलावामध्ये कोसळले होते. हे विमान स्मर्ना रदरफोर्ड काउंटी विमानतळावरून पांम बीच या आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे निघाले होते. राष्ट्रीय परिवहन सुरक्षा मंडळ व एफएए या पथकांनी अपघात झालेल्या ठिकाणी उपस्थित असून तपास सुरू आहे. 

लारा जो ने 2002 मध्ये वीस वर्षाच्या कालावधीनंतर अभिनय करणे सोडले कारण त्यांना संगीत क्षेत्रात आपले करियर करायचे होते. लारा यांच्या अभिनय क्षेत्राच्या शिखरावर असताना हा काळ होता. त्यांची आर्मस्ट्रॉं व वॉरहेड अशा अॅक्शन सिनेमासाठी आठवण केली जाते.  

Edited By - Puja Bonkile

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com