एक कॉल करा डबा मिळवा; शिक्षकांनी सुरू केली अन्नपेढी

एक कॉल करा डबा मिळवा; शिक्षकांनी सुरू केली अन्नपेढी
tiffin

अकोला - अकोल्यातील Akola दापुरा केंद्रातील 35 शिक्षकांनी Teachers एकत्र येत पैसे गोळा करून कोरोना Corona संकटाच्या काळात जिल्ह्यातील गरजू आणि रुग्णांच्या नातेवाइकांसाठी अन्नपेढी food bank सुरू केली. आज दररोज या अन्नपेढीतून चविष्ट असे जेवणाचे डबे शिक्षक स्वतः गरजूना पुरवतात. विशेष म्हणजे शिक्षिका स्वतः स्वयंपाक करण्यासाठी हातभार लावत आहेत.  Teachers started a food bank

कोरोनाच्या संकटात हातावर पोट असणाऱ्यांचे एक वेळ जेवणाचे वांदे होत आहेत. तसेच कोरोना झालेले अनेक जण आज रुग्णालयात Hospital भरती आहेत, त्यांच्या जेवणाची व्यवस्था होत नाही. अशा कुटुंबीय व नातेवाइकांसाठी मोफत जेवणाचा डबा पुरविण्याचा प्रेरणादायी उपक्रम शिक्षकांनी सुरू केला आहे. डब्या साठी नोंदणी करायची असल्यास शिक्षकांनी आपले व्हॉट्स नंबर दिले आहेत.

हे देखील पहा -

या नंबरवर कॉल केल्यास गरजुंना डबा पुरवला जात आहे. त्या ठिकाणी स्वतः शिक्षक  डबा पोहचून देतात आणि विशेष म्हणजे या उपक्रमात शिक्षिका आपले घरचे काम सांभाळून स्वतः स्वयंपाक बनवण्यासाठी हातभार लावत आहेत. सुरुवातीला हा उपक्रम केवळ शिक्षकांसाठी होता आता मात्र कुणालाही जेवणाचा डबा लागल्यास एका फोनवर डबा मिळत आहे. Teachers started a food bank

शिक्षकीपेशा सोबतच दु:खी, पीडितांच्या तोंडी अन्नाचे दोन घास खाऊ घालण्याच्या या उपक्रमाला शिक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. या अन्नपेढीसाठी शिक्षक वर्गणी गोळा करून आपल्या सहकारी शिक्षकांना मदतीचा हात देत आहेत. त्यांचे कार्य कौतुकास्पद तर आहेच, शिवाय प्रेरणादायी सुद्धा आहे. 

कोरोना मुळे शाळा बंद असल्याने जिल्हा परिषद शिक्षकांनी समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा ठेऊन हा उपक्रम सुरू केला आहे. शाळा सुरू झाल्यानंतरही हा उपक्रम चालूच ठेवण्याची आशा त्यांनी बोलून दाखवली. केंद्रप्रमुख श्रीकृष्ण गावंडे यांच्या पुढाकारातून सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचे जिल्हाभरातील शिक्षकांकडून कौतुक होत आहे.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com