तापसी पन्नूच्या 'हसीन दिलरुबा' चित्रपटाचा टिझर लाँच; पाहा VIDEO

तापसी पन्नूच्या 'हसीन दिलरुबा' चित्रपटाचा टिझर लाँच; पाहा VIDEO
haseen dilruba

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री तापसी पन्नू सध्या तिच्या आगामी 'हसीन दिलरुबा' चित्रपटाविषयी बरीच चर्चेत आहे. चित्रपटाचे पोस्टर्स अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नुकताच चित्रपटाचा टीझर लाँच झाला आहे. इंटरनेटवर या टिझरला प्रचंड लोकप्रियता मिळत आहे. या चित्रपटात तापसी सोबत अभिनेता विक्रांत मेसी आणि हर्षवर्धन राणे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. टीझर पाहून चाहते खूप उत्साही आहेत. हा टीझर इंटरनेटवर खूप व्हायरल होत आहे.(Teaser launch of Tapsi Pannu's 'Hasoon Dilruba'  WATCH VIDEO)

हे देखील पाहा

'हसीन दिलरुबा' चित्रपटाच्या टीझरमध्ये तापसी पन्नू आणि विक्रांत मेसी हे एक विवाहित जोडपे असून, हर्षवर्धनसोबतचे त्यांचे संबंध आणि तिघांचे आयुष्य कसे एकमेकांना जोडले गेले आहे हे दाखवले आहे. त्यानंतर त्यातील एकाचा मृत्यू होतो. हा चित्रपट एक गूढ थ्रिलर आहे. हा चित्रपट 2 जुलैला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विनील मॅथ्यू यांनी केले आहे.  आनंद एल राय आणि हिमांशू शर्मा या चित्रपटाचे निर्माते आहेत. चित्रपटाचा टिझर पाहिल्यानंतर प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता आहे.

'हसीन दिलरुबा' नंतर तापसी 'शाबास मीठ्ठू' या स्पोर्ट्स ड्रामा चित्रपटातही दिसणार आहे. हा चित्रपट भारतीय महिला क्रिकेट संघाच्या माजी कर्णधार मिताली राज यांच्या जीवनावर आधारित आहे. यासह, ती आकाश भाटियाच्या 'लूप लपेता' चित्रपट आणि आकाश खुरानाच्या 'रश्मी रॉकेट' मध्ये देखील दिसणार आहे.

Edited By : Pravin Dhamale

ताज्या बातम्यासाठी भेट द्या
Website - https://www.saamtv.com/
Twitter - https://twitter.com/saamTVnews
Facebook- https://www.facebook.com/SaamTV
ताज्या व्हिडिओंसाठी पहा
युट्यूब - https://www.youtube.com/channel/UC6cxTsUnfSZrj96KNHhRTHQ
टेलिग्राम - https://t.me/SaamNews

 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com