सातपुडा दुर्गम भागासाठी दहा बाईक ॲम्ब्युलन्सचे पालकमंत्री के.सी.पाडवी यांच्या हस्ते लोकार्पण

सातपुडा दुर्गम भागासाठी दहा बाईक ॲम्ब्युलन्सचे पालकमंत्री के.सी.पाडवी यांच्या हस्ते लोकार्पण
Ten bike ambulances from Guardian Minister Adv Padvi to Satpuda remote area

नंदुरबार :  सातपुडा Satpuda पर्वत रागांमध्ये ज्या ठिकाणी रस्ते नव्हते अशा खडतर परिस्थीतीमध्ये रुग्णांची ने-आण करण्यासाठी मोठी कसरत होत होती. यावर मात करण्यासाठी आता नंदुरबार Nandurbar आरोग्य प्रशासनाने आपल्या ताफ्यात रुग्णांची ने आण करण्यासाठी बाईक ॲम्ब्युलन्सचा समावेश केला आहे. Ten bike ambulances from Guardian Minister Adv Padvi to Satpuda remote area

आज जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आदिवासी विकास मंत्री अॅड. के.सी. पाडवी K. C. Padvi यांच्या हस्ते दहा बाईक ॲम्ब्युलन्सचे Bike ambulance लोकार्पण करण्यात आले आहे.  66 लाख किमतीच्या या दहा बाईक ॲम्ब्युलन्स खडतर परिस्थीती असलेल्या दुर्गम भागात ठेवण्यात येणार आहेत. 

हे देखील पहा -

दोन वर्षे याच्या चालकासह सर्व खर्च संबंधीत ठेकेदार करणार आहे. सातपुड्याच्या दुर्गम भागात रस्ते नसल्याने झोळीच्या बांबुमध्ये रुग्ण टाकुन तो दवाखान्यापर्यत पोहचवला जात. आता याच बांबुलंन्सला पर्याय म्हणुन या बाईक ॲम्ब्युलन्सकडे पाहीले जात आहे. विशेष म्हणजे या बाईक ॲम्ब्युलन्स मध्ये 10 लिटरच्या ऑक्सिजन सिलेंडरची सोय देखील करण्यात आली आहे. Ten bike ambulances from Guardian Minister Adv Padvi to Satpuda remote area

अशाच पद्धतीने गडचिरोली Gadchiroli, पालघर  Palghar आणि रायगड Raigad जिल्ह्यातल्या  आदिवासी बहुल भागात आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातुन बाईक ॲम्ब्युलन्स उपलब्ध करुन देणार असल्याचे यावेळी मंत्री के.सी पाडवी यांनी सांगितले.

Edited By- Sanika Gade

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com