केंजळगडावर ट्रेकिंग करताना दहा वर्षांचा मुलगा दरीत कोसळून गंभीर जखमी
ट्रेकिंग

केंजळगडावर ट्रेकिंग करताना दहा वर्षांचा मुलगा दरीत कोसळून गंभीर जखमी

सातारा - वाई Wai तालुक्यातील केंजळगडावर Kenjalgad ट्रेकिंग Trekking करण्यासाठी गेलेला असताना दहा वर्षाचा मुलगा खोल दरीत कोसळून गंभीर जखमी झाला आहे. त्यास पाखेरी वस्तीतील युवक आणि ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले आहे. Ten year old boy fell into a ravine while trekking on Kenjalgad and injured seriously 

वाई येथील प्राथमिक उपचारानंतर पुणे Pune  येथे पुढील उपचारासाठी त्याला दाखल करण्यात आले आहे. केंजळगडावर पर्वतारोहण करण्यासाठी सासवड Saswad (ता.पुरंदर) परिसरातील रहिवासी असलेले सात ते आठ पर्यटक आले होते.

यामध्ये मयांक उरणे हा आपल्या वडीलांसोबत आला होता. या ग्रुपने केंजळ गड चढण्यास सुरवात केल्या नंतर या ग्रुपमधील मयंक उरणे (वय १०)  हा दोनशे फूट खोल कोसळून गंभीर जखमी झाला. सतत पावसाची Rain रिपरिप सुरू होती. त्यामुळे पायवाटा देखील निसरड्या झाल्या होत्या.

हे देखील पहा -

यामुळे मयांकचा पाय घसरून तो दोनशे फूट दरीत कोसळला. मात्र खोल दरीत झाडाला धडकून एका झुडपात तो सुदैवाने अडकला होता.  त्याचा शोध करुनही तो सापडत नसल्याने आसरे ते रायरेश्वर रस्त्यावर असणाऱ्या पाखिरे वस्तीवर संबंधित पर्यटकांनी येऊन माहिती दिली.

तेथील ग्रामस्थांना सोबत घेऊन मयंक उरणे याचा शोध घेण्यास गेले असता त्यांनी खोल दरीतून त्याला गंभीर जखमी अवस्थेत शोधुन बाहेर काढले.वाई येथील रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्याला पुण्यात दाखल करण्यात आले आहे. 

Edited By : Krushnarav Sathe

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com